दौंड
दौंड हे पुणे जिल्ह्यातील एक शहर व दौंड तालुक्याचे मुख्यालय आहे. पुणे व अहमदनगर शहरांपासून प्रत्येकी ८० किमी तर सोलापूर शहरापासून १८६ किमी अंतरावर असलेल्या दौंडची लोकसंख्या २०११ साली ४९,४५० इतकी होती.
दौंड | |
भारतामधील शहर | |
दौंड रेल्वे स्थानक |
|
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
जिल्हा | पुणे जिल्हा |
लोकसंख्या (२०११[१]) | |
- शहर | ४९,४५० |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० |
दौंड रेल्वे स्थानक हे महाराष्ट्रामधील महत्त्वाच्या जंक्शन रेल्वे स्थानकांपैकी एक असून पुण्याहून दक्षिणेकडे व उत्तरेकडे धावणाऱ्या सर्व रेल्गाड्यांचा येथे थांबा आहे. दौंड शहर पुणे-सोलापूर महामार्गापासून ९ किमी अंतरावर आहे. महाराष्ट्र राज्य महामार्ग १० दौंडपासून सुरू होतो व धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा ह्या गावापाशी संपतो.
हवामान
संपादनयेथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते.