देवगिरी एक्सप्रेस (तेलुगू: దేవగిరి ఎక్స్‌ప్రెస్) ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. ही गाडी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते तेलंगणा च्या लिंगमपल्ली रेल्वे स्थानकादरम्यान रोज धावते. दक्षिण मध्य रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसला छत्रपती संभाजीनगर जवळील देवगिरी ह्या ऐतिहासिक किल्ल्याचे नाव देण्यात आले आहे.

देवगिरी एक्सप्रेसचा फलक
देवगिरी एक्सप्रेसचा मार्ग

तपशील

संपादन
गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी सरासरी वेग अंतर
१७०५७ मुंबई छशिमट – लिंगमपल्ली २१:१० १५:४० रोज ५६ किमी/तास ९०५ किमी
१७०५८ लिंगमपल्ली – मुंबई छशिमट १२:२५ ०७:१० रोज

प्रमुख थांबे

संपादन

बाह्य दुवे

संपादन