दुसरे इंग्रज-मराठा युद्ध

(दुसरे आंग्ल-मराठा युद्ध या पानावरून पुनर्निर्देशित)
दुसरे इंग्रज-मराठा युद्ध
दुसरे इंग्रज-मराठा युद्ध ह्या युद्धाचा भाग
वसईची लढाई
वसईची लढाई
दिनांक इ.स. १८०३-इ.स. १८०५
स्थान मध्य भारत
परिणती ब्रिटिशांचा विजय
युद्धमान पक्ष
मराठा साम्राज्य ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी
सेनापती
दौलतराव शिंदे
यशवंतराव होळकर
राघोजी भोसले
पिएर कलिये-पेरॉं
आर्थर वेलेस्ली
जरार्ड लेक
जेम्स स्टीवन्सन
सैन्यबळ
३,००,००० २७,३१३ ब्रिटिश सैनिक शिवाय स्थानिक लश्कर, मद्रास पायोनियर्स, तोफखाना

दुसरे इंग्रज-मराठा युद्ध हे मराठा साम्राज्यईस्ट इंडिया कंपनी यांच्यात इ.स. १८०३-०५ दरम्यान झालेले युद्ध होते.

पार्श्वभूमी

संपादन

दुसरा बाजीराव पेशवा हा अधिकाराने जरी मराठ्यांच्या राज्याचा मुख्य कार्यकारी असला तरी पेशव्यांचे राज्यावरचे नियंत्रण संपुष्टात आल्यात जमा होते. मराठ्यांची सत्ताकेंद्र पुण्यावरून आता इंदूरग्वाल्हेर येथे गेले. महादजी शिंद्याच्या निधना नंतर मराठ्याच्या एकीमधील कच्चे दुवे बाहेर येउ लागले. पेशवे व शिंदेना होळकरांनी ऑक्टोबर २५ १८०२ रोजी पुण्याच्या जवळ पराभूत केले. पराभवा नंतर होळकरांनी पुण्याचा ताबा घेतला व दुसरा बाजीराव पळून इंग्रजाकडे आश्रयासाठी गेला व संधी केली जी वसईचा तह या नावाने ओळखली जाते. या तहानुसार इंग्रजांनी बाजीरावला मराठ्यांच्या सत्ता स्थानी पुन्हा बसवण्यासाठी मदत करण्याचे मान्य केले. बाजीरावच्या या देशघातकी निर्णयाने मराठे संस्थनिकात संतापाची लाट उसळली व ब्रिटीशांविरुद्ध युद्ध पुकारले. मराठे संस्थानिकांनीही फ्रेंचांकडून सैन्य मदत घेतली होती. भारतातील फ्रेंच प्रभुत्व कमी करणे हेही ब्रिटीशांचे धोरण होते. अश्या प्रकारे बाजीराव-इंग्रज सरकार व ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध शिंदे व इतर काही मराठा संस्थानिक असे दुसरे इंग्रज मराठा युद्ध सुरू झाले.

मराठ्यांचे नेतृत्व शिंद्या कडे होते तर इंग्रजाचे नेतृत्व आर्थर वेलस्ली व जनरल लेक यांनी केले. एका इतिहासकाराच्या मते आर्थर वेलेस्लीचा नाद पुरवण्यासाठी लॉर्ड वेलेस्ली ने हे युदध् उकरून काढले

युद्ध

संपादन

ब्रिटीशांनी मुख्यत्वे दोन आघाड्या उघडल्या उत्तरेकडील आघाडीचे नेतृत्व लेक यांनी केले तर दक्षिणेकडे वेलेस्लीने आघाडी सांभाळली. इंग्रजांनी मराठ्यांना चुचकारण्यासाठी सरळसरळ संस्थानिकांच्या शहरांवर हल्ल्याची योजना बनवली. शिंद्या निही शत्रुला लवकर संपवावे या दृष्टीने आपली सेना दक्षिणेला भोसल्यांच्या मदतीला पाठवली. महाराष्ट्रात जालना जिल्ह्यात आसई, अकोला जिल्ह्यात आडगाव तसेच चिखलदऱ्याजवळील गविलगड येथे वेलेस्लीने मराठ्यांचा निर्णायक पराभव केला. उत्तरेकडे जनरल लेक यांनी दिल्ली काबीज केली.

यशवंतराव होळकरांनी मराठ्यांची चाललेली ससेहोलपट पाहून युद्धात उतरण्याचा निर्णय घेतला. लष्करी दरारा व मुत्सदेगीरी यावर इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. मराठे संस्थानिकांचे सार्वभौमत्व कायम राहिले परंतु मराठ्यांना गुजरात व ओरिसाचा भूभाग गमवावा लागला.

मागील:
पहिले इंग्रज-मराठा युद्ध
इंग्रज-मराठा युद्धे
पुढील:
तिसरे इंग्रज-मराठा युद्ध