त्रिपुरा
त्रिपुरा (बांग्ला: ত্রিপুরা) हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे.[१] याच्या उत्तरेला व पश्चिमेला बांग्लादेश, ईशान्येला आसाम व पूर्वेला मिझोरम ही राज्ये आहेत. त्रिपुराचे क्षेत्रफळ १०.४९२ चौ.किमी एवढे आहे. आगरताळा हे त्रिपुराच्या राजधानीचे व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. या राज्याची लोकसंख्या ३६,७१,०३२ एवढी आहे. तांदूळ, डाळ, ताग, कापूस ही त्रिपुराची प्रमुख पिके आहेत. राज्याची साक्षरता ८७.७५ टक्के आहे. गोमती व खोवाई या येथील प्रमुख नद्या आहेत. येथे त्रिपुरी वंशाचे लोक देखील आढळतात. बंगालीसोबत ककबरक ही येथील एक अधिकृत भाषा आहे. मणिपुरी ही देखील त्रिपुरामधील एक प्रमुख भाषा आहे.
?त्रिपुरा भारत | |
— राज्य — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | १०,४९२ चौ. किमी |
राजधानी | अगरताळा |
मोठे शहर | अगरतला |
जिल्हे | 4 |
लोकसंख्या • घनता |
३१,९१,१६८ (21st) • ३०४/किमी२ |
भाषा | बंगाली, Kokborok (Tripuri) |
राज्यपाल | D. N. Sahay |
मुख्यमंत्री | बिपलब कुमार देव |
स्थापित | 1972-01-21 |
विधानसभा (जागा) | त्रिपुरा विधानसभा (60) |
आयएसओ संक्षिप्त नाव | IN-TR |
संकेतस्थळ: tripura.nic.in |
इतिहास
संपादनत्रिपुरा मधील हासरा आणि खोवई घाटांमध्ये जीवाश्म लाकडापासून बनवलेली उच्च पालीओलिथिक साधने सापडली आहेत. त्रिपुराचे एक प्राचीन नाव किरत देश आहे.
भूगोल
संपादनयावरील विस्तृत लेख पहा - त्रिपुरामधील जिल्हे
त्रिपुरा राज्यात ४ जिल्हे आहेत.
त्रिपुरा उत्तर-पूर्व भारतातील एक राज्य आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅंड आणि त्रिपुरा सात भगिनी राज्य म्हणून ओळखल्या जातात.
चित्रदालन
संपादन-
एका जनजातीमधील महिला
संदर्भ
संपादन- ^ "Tripura | History, Map, Population, & Facts". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2021-10-20 रोजी पाहिले.