आगरताळा

त्रिपुरा राज्याची राजधानी
(अगरताळा या पानावरून पुनर्निर्देशित)

आगरताळा (बांग्ला: আগরতলা) ही भारत देशाच्या त्रिपुरा राज्याची राजधानी सर्वात मोठे शहर आहे. २०११ साली ४ लाख लोकसंख्या असलेले आगरताळा गुवाहाटीइंफाळ खालोखाल ईशान्य भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. आगरताळा त्रिपुराच्या पश्चिम भागात भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमेपासून २ किमी अंतरावर वसले आहे.

आगरताळा
আগরতলা
भारतामधील शहर


आगरताळा is located in त्रिपुरा
आगरताळा
आगरताळा
आगरताळाचे त्रिपुरामधील स्थान
आगरताळा is located in भारत
आगरताळा
आगरताळा
आगरताळाचे भारतमधील स्थान

गुणक: 23°50′0″N 91°16′48″E / 23.83333°N 91.28000°E / 23.83333; 91.28000

देश भारत ध्वज भारत
राज्य त्रिपुरा
जिल्हा पश्चिम त्रिपुरा
क्षेत्रफळ ७६.५ चौ. किमी (२९.५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७५ फूट (२३ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ४,००,००४
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ
agartalacity.nic.in


आगरताळा रेल्वे स्थानक हे रेल्वे स्थानक चालू झाल्यानंतर रेल्वेने जोडले गेलेले आगरताळा हे ईशान्य भारतातील दुसरेच राजधानीचे शहर ठरले. आजच्या घडीला येथून दिल्लीकोलकाता शहरांसाठी थेट गाड्या सुटतात. आगरताळा विमानतळ हा शहरापासून ५ किमी अंतरावर असून येथे एर इंडिया, इंडिगो इत्यादी अनेक प्रमुख विमान वाहतूक कंपन्या प्रवासी सेवा पुरवतात.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत