तृषा कृष्णन ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. तृषा ने मुख्यतः तमिळ सिनेमा तथा तेलुगू सिनेमात काम केले.

तृषा कृष्णन
तृषा कृष्णन
जन्म ४ मे, १९८३ (1983-05-04) (वय: ४१)
चेन्नई, तामिळनाडू, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ सन १९९९ -पासुन
भाषा तमिळ, तेलुगू

व्यक्तिगत परिचय

संपादन

तृषा कृष्णन (मे ४, १९८३;चेन्नई,तमिळनाडू ) (मल्याळम: തൃഷ കൃഷ്ണന്‍ तमिळ: த்ரிஷா கிருஷ்ணன்) ही तमिळतेलुगू चित्रपटातील अभिनेत्री आहे. ती मूळची केरळातील असून सध्या चेन्नै येथे वास्तव्यास आहे. तिने अभिनय केलेले सामी आणि गिल्ली हे तमिळ चित्रपट गाजलेले असून तेलुगू चित्रपटांमध्ये वर्षम् हा चित्रपट सर्वाधिक यशस्वी ठरला आहे.

चित्रपट कारकीर्द

संपादन
वर्ष चित्रपट भूमिका भाषा इतर टिपा
1999 जोडी-फिल्म गयूची मैत्रीण तमिळ पाहुणी कलाकार
2002 लेसा लेसा बालामणी तमिळ 'विजेती:' आयटीएफए सर्वोत्तम नवोदित अभिनेत्री पुरस्कार
मौनम पेसियदे संध्या तमिळ 'विजेती', फिल्मफेअर सर्वोत्तम नवोदित अभिनेत्री
मनसेल्लाम मलर तमिळ
2003 अलै मीरा तमिळ
सामी भुवना तमिळ
ऍनक्कु २० उनक्कु १८ प्रीती तमिळ
2004 वर्षम सैलजा तेलुगू 'विजेती', फिल्मफेअर Best तेलुगू Actress Award
'विजेती', Santosham Best Actress Award
'विजेती', CineMAA Award for Best Actress
गिल्ली धनलक्ष्मी तमिळ
आयुद ऍळुदु मीरा तमिळ
2005 तिरुप्पाची सुभा तमिळ
नुव्वोस्तनन्टे नेन्नोडांतना सिरी तेलुगू 'विजेती', फिल्मफेअर सर्वोत्तम तेलुगू अभिनेत्री पुरस्कार
'विजेती', Nandi Award for Best Actress
'विजेती', CineMAA Award for Best Actress
जि भुवन तमिळ
अत्ताडु पुरी तेलुगू नामांकन, फिल्मफेअर Best तेलुगू Actress Award
अल्लारी बुल्लोडु तृषा राव तेलुगू
आरु महालक्ष्मी तमिळ
2006 आती अंजली तमिळ
पौर्णमी पौर्णिमा तेलुगू
बंगारम पाहुणी भूमिका तेलुगू पाहुणी भूमिका
Something Something ... उनक्कुम ऍनक्कुम कविता तमिळ 'विजेती', Vijay Award for Favourite Heroine
स्टॅलिन चित्रा तेलुगू
सैनिकुडु वरलक्ष्मी तेलुगू
2007 आदावरी माटालाकु अर्धालू वेरूले कीर्ती तेलुगू 'विजेती', CineMAA Award for Best Actress
'विजेती' फिल्मफेअर Best तेलुगू Actress Award
किरीडम दिव्या तमिळ
2008 Krishna Sandhya तेलुगू नामांकन, फिल्मफेअर Best तेलुगू Actress Award
भीमा शालिनी तमिळ
वेल्ली तिरै स्वतः तमिळ पाहुणी कलाकार
कुरुवी देवी तमिळ
बुज्जीगाडू चित्ती तेलुगू
अभियूम नानूम Abhi Raghuram तमिळ 'विजेती', तमिळ Nadu State Film Special Award for Best Actress
नामांकन, फिल्मफेअर Best तमिळ Actress Award
किंग (२००८ तेलुगू चित्रपट) श्रावणी तेलुगू
2009 सर्वम संध्या तमिळ
संखम महालक्ष्मी पसुपती तेलुगू
2010 नमो वेंकटेसा श्रावणी तेलुगू चित्रीकरण चालू
विनैतांडी वरुवाया जेस्सी तेकेकुट्टु तमिळ प्रदर्शित
खट्टा मीठा(२०१० चित्रपट) गणफुले बाई हिंदी भाषा प्रदर्शित
चेन्नैयील ओरु मळैकालम तमिळ चित्रीकरण

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ दुवे

संपादन

बाह्य दुवे

संपादन