तुळशीदास वसंत बोरकर (जन्म : १८ नोव्हेंबर १९३४; - २९ सप्टेंबर २०१८) हे एक मराठी हार्मोनियमवादक होते.

तुळशीदास बोरकर
जन्म नाव तुळशीदास वसंत बोरकर
जन्म नोव्हेंबर १८, इ.स. १९३४
बोरी,गोवा
मृत्यू २९ सप्टेंबर २०१८
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र वाद्यसंगीत
संगीत दिग्दर्शक
वडील वसंत
पुरस्कार पद्मश्री सन्मान

त्यांचा जन्म गोव्यातील बोरी या गावात झालाी. ते लहानपणीच पुण्यात आले. गुरू मधुकर पेडणेकर यांच्याकडून हार्मोनियम शिकण्यासाठी ते रोज पुणे-मुंबई ये-जा करत.

तुळशीदास बोरकरांनी उस्ताद आमीर खान, पंडित भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व आदी दिग्गज कलावंतांना पेटीची साथ केली आहे.

तुळशीदास बोरकर हे प्रा. मधुकर तोरडमल दिग्दर्शित हे बंध रेशमाचे या नाटकाचे साहाय्यक संगीत दिग्दर्शक होते.

बोरकरांना भारत सरकारने २०१६ साली पद्मश्री पुरस्कार प्रदान केला.


छोटा गंधर्व यांची साथ करताना तुळशीदास बोरकर


अन्य बोरकर

पुरस्कार

संपादन

संदर्भ

संपादन