ताठरता-ऊर्जा प्रदिश
ताठरता-ऊर्जा प्रदिश (किंवा ताठरता-ऊर्जा-संवेग प्रदिश) ही भौतिकीतील एक प्रदिश असून ती अवकाशकालातील ऊर्जा आणि संवेगाची घनता आणि प्रवाहाचे परिमाण आहे. त्याचप्रमाणे न्यूटनियन भौतिकीतील ताठरता प्रदिशाचे व्यापकीकरण आहे. हे द्रव्य, किरणोत्सर्ग आणि निर्गुरुत्व बल क्षेत्राची वैशिष्ट्ये आहेत.
जसे वस्तुमान घनता हे न्यूटनियन गुरुत्वाकर्षाणात गुरुत्व क्षेत्राचा स्रोत आहे तसे सामान्य सापेक्षतेतील आइनस्टाइनची क्षेत्र समीकरणांतील ताठरता-ऊर्जा प्रदिश हा गुरुत्व क्षेत्राचा स्रोत आहे.