अभिजात यामिकानुसार रेषीय संवेग (इंग्लिश: Momentum, मोमेंटम) (आंगप एककः किग्रा.मी./से., किंवा, न्यू.से.) हे एखाद्या वस्तूच्या वस्तुमानाचावेगाचा गुणाकार असतो.

वेगाप्रमाणेच संवेगदेखील सदिश राशींमध्ये मोडतो; कारण त्यात परिमाण व दिशा, असे दोन्ही गुणधर्म असतात. रेषीय संवेगात अक्षय्यतेचा गुणधर्मही दिसून येतो - म्हणजे एखाद्या संवृत प्रणालीवर कोणतेही बाह्य बल काम करत नसल्यास, त्या प्रणालीतील एकूण रेषीय संवेग घटत किंवा वाढत नाही. संवेग अक्षय्यतेचा नियम या नावाने हा गुणधर्म ओळखला जातो.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.