डेट्रॉईट मेट्रोपॉलिटन वेन काउंटी विमानतळ

(डीट्रॉइट मेट्रोपॉलिटन विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

डेट्रॉईट मेट्रोपॉलिटन वेन काउंटी विमानतळ (इंग्लिश: Detroit Metropolitan Wayne County Airport; IATA: DTW) हा अमेरिकेमधील एक प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ मिशिगन राज्यातील डेट्रॉईट महानगराला विमानसेवा पुरवतो. हा विमानतळ डेट्रॉईट शहराच्या २२ मैल नैऋत्येस स्थित असून तो ४,८५० एकर इतक्या भूभागावर पसरला आहे.

डेट्रॉईट मेट्रोपॉलिटन वेन काउंटी विमानतळ
आहसंवि: DTWआप्रविको: KDTW
DTW is located in मिशिगन
DTW
DTW
विमानतळाचे मिशिगनमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक वेन काउंटी एअरपोर्ट ऑथोरिटी
कोण्या शहरास सेवा डेट्रॉईट महानगर
स्थळ रॉम्युलस, मिशिगन
हब डेल्टा एअरलाइन्स
स्पिरिट एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ६४५ फू / १९७ मी
गुणक (भौगोलिक) 48°15′45″N 83°21′12″W / 48.26250°N 83.35333°W / 48.26250; -83.35333
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
4R/22L 12,003 3,659 कॉंक्रीट
4L/22R 10,000 3,048 डांबरी/कॉंक्रीट
3R/21L 10,001 3,048 कॉंक्रीट
3L/21R 8,501 2,591 डांबरी/कॉंक्रीट
9L/27R 8,708 2,654 डांबरी/कॉंक्रीट
9R/27L 8,500 2,591 कॉंक्रीट
सांख्यिकी (2015)
एकूण प्रवासी (2015) 33,440,112
माल वाहतूक (2014) 202,066 टन
उड्डाणे (2015) 379,376
स्रोत: www.metroairport.com[१]
येथे थांबलेले लुफ्तान्साचे एअरबस ए३३० विमान

१९३० साली वेन काऊंटी एअरपोर्ट ह्या नावाने खुला करण्यात आलेला हा विमानतळ अमेरिकेमधील सर्वात अद्ययावत व प्रगत विमानतळांपैकी एक मानला जातो. ह्या विमानतळाला ६ धावपट्ट्या व २ टर्मिनल्स आहेत व तो डेल्टा एरलाइन्स दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा हब आहे.

संदर्भ संपादन

  1. ^ "Airport Statistics 2011" (PDF). Wayne County Airport Authority. 2012. Archived from the original (PDF) on 2013-01-24. January 10, 2013 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन