डायनोसॉर किंवा भिमकाय प्राणी हे इतिहासपूर्व काळातील पृथ्वीवरील सरपटणारे प्राणी व पक्षी होते. सुमारे २३ कोटी वर्षांपूर्वी डायनोसॉर प्राण्यांचे पृथ्वीवर वर्चस्व होते. ९,००० पेक्षा अधिक अधिक जाती अस्तित्वात असलेल्या डायनोसॉरपैकी काहींमध्ये उडण्याची क्षमता होती; काही शाकाहारी होते तर काही मांसाहारी; काही द्वीपादी होते तर काही चतुष्पाद. साधारणपणे अवाढव्य आकारासाठी विख्यात असणाऱ्या डायनोसॉरपैकी मानवी आकाराचे देखील अनेक प्राणी होते.

डायनोसॉर
अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी मधील डायनोसॉरचा सापळा
अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी मधील डायनोसॉरचा सापळा
प्रजातींची उपलब्धता
विलुप्त
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
वर्ग: डायनोसॉरिया

सुमारे ६.५ कोटी वर्षांपूर्वी घडलेल्या एका मोठ्या विनाशचक्रा दरम्यान डायनोसॉरचा अस्त झाला.

हिंदी महासागरात आफ्रिका खंडाच्या पूर्वकिनाऱ्याच्या लगत असलेल्या मादागास्कर या प्रचंड बेटवजा देशांमध्ये आढळलेल्या डायनॉसॉरसच्या पायांच्या अवशेषावरून, डायनॉसॉरस मांसाहारी होते या कल्पनेला पुष्टी मिळाली आहे.

सुमारे साठ ते पासष्ट लक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर वावरणाऱ्या डायनॉसॉरसना ‘बालाऊर बोंडॉक’ शास्त्रीय संज्ञेने ओळखण्यात येते. पाय उचलून पावला मार्फत जोरदार प्रहार करण्याच्या क्षमता या जीवांमध्ये होती. डाव्या, उजव्या पावलांच्या कडेला वक्राकार नख्या असल्याने भक्ष्याला रक्तबंबाळ करून खाणे शक्य होते.

बालाऊर बोंडॉक या प्रकारच्या डायनोसॉरचे अवशेष उत्तर कॅनडा, रोमेनिया, ऑस्ट्रिया या देशांमध्येही सापडले आहेत. त्यामुळे त्यांचा वावर शीत कटिबंधातील प्रदेशात होता असे मानले जाते. भक्ष्यांची संख्या कमी कमी होत राहिल्याने उपासमार, शिकार करण्यासाठी प्रचंड भटकंती इत्यादी कारणांमुळे डायनोसॉर पृथ्वीवरून सुमारे तीस दशलक्ष वर्षांपूर्वी नामशेष झाले असावेत असे मानणारे काही विचार प्रवाह आहेत.

जीवाष्म

संपादन

आशिया, आफ्रिका युरोप व उत्तर अमेरिका खंडात सापडलेले जीवाश्म, अंडी, सांगाडे आणि इतरही माहिती यांचे आधारे इतिहासाचे दर्शन होते.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: