झाग्रेब

(जाग्रेब या पानावरून पुनर्निर्देशित)


झाग्रेब (क्रोएशियन: Zagreb) ही पूर्व युरोपातील क्रोएशिया देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. झाग्रेब शहर क्रोएशियाच्या उत्तर-मध्य भागात सावा नदीच्या काठावर वसले आहे. २०१३ साली झाग्रेब शहराची लोकसंख्या सुमारे ७.९५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ११.१२ लाख होती. क्रोएशियाचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र असलेले झाग्रेब बाल्कन प्रदेशातील एक प्रमुख शहर आहे.

झाग्रेब
Zagreb
क्रोएशिया देशाची राजधानी


ध्वज
चिन्ह
झाग्रेबचे क्रोएशियामधील स्थान

गुणक: 45°49′0″N 15°59′0″E / 45.81667°N 15.98333°E / 45.81667; 15.98333

देश क्रोएशिया ध्वज क्रोएशिया
स्थापना वर्ष इ.स. १०९४
क्षेत्रफळ ६४१.३ चौ. किमी (२४७.६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५१८ फूट (१५८ मी)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ७,९५,५०५
  - घनता १,२०० /चौ. किमी (३,१०० /चौ. मैल)
  - महानगर ११,१२,५१७
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.zagreb.hr/

झाग्रेबला दैदिप्यमान इतिहास लाभला असून रोमन लोकांनी येथे पहिल्या शतकामध्ये वसाहत स्थापन केली. सध्या झाग्रेब क्रोएशियामधील एक विकसित व उच्चभ्रू राहणीमान असलेले जागतिक शहर आहे. दरवर्षी सुमारे १० लाख पर्यटक झाग्रेबला भेट देतात.

इतिहास

संपादन

रोमन साम्राज्याने अंदाजे इ.स.च्या पहिल्या शतकात ह्या भागात आंदुतोनिया नावाची वसाहत बनवली. झाग्रेब हे नाव इ.स. १०९४ मध्ये प्रथम वापरात आले. झाग्रेब ह्या शब्दाचे मूळ अज्ञात आहे व हे नाव कसे पडले ह्याबद्दल अनेक दंतकथा अस्तित्वात आहेत. १६व्या शतकामध्ये झाग्रेब क्रोएशिया व स्लाव्होनिया प्रदेशांचे राजकीय केंद्र बनले. १७व्या व १८व्या शतकांदरम्यान झाग्रेबामध्ये अनेकदा आगी लागल्या व प्लेग रोगाच्या अनेकदा साथी आल्या ज्यांमध्ये झाग्रेबची पीछेहाट होत गेली. १९व्या शतकाच्या सुरुवातीस घडलेल्या क्रोएशियन राष्ट्रीय पुनरुज्जीवनादरम्यान झाग्रेबचे महत्त्व वाढले व येथे अनेक नव्या सुधारणा घडवून आणल्या गेल्या. १८८० सालच्या झाग्रेब भूकंपानंतर पहिल्या महायुद्धापर्यंतच्या काळादरम्यान झाग्रेब प्रगतीपथावर राहिले. १९२० च्या दशकात झाग्रेबची लोकसंख्या तब्बल ७० टक्क्यांनी वाढली.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान झाग्रेब क्रोएशियाचे स्वतंत्र राज्य ह्या नाझी जर्मनीच्या मांडलिक राष्ट्राच्या राजधानीचे शहर होते. १९४५ ते १९९२ दरम्यान झाग्रेब युगोस्लाव्हिया देशाचा भाग होते. १९९१ ते १९९५ दरम्यान घडलेल्या क्रोएशिया स्वातंत्र्ययुद्धामध्ये झाग्रेब कोणत्याही मोठ्या नुकसानीपासून बचावले.

भूगोल

संपादन

झाग्रेब शहर क्रोएशियाच्या उत्तर-मध्य भागात सावाच्या काठावर समुद्रसपाटीपासून ११६.७५ मीटर (३८३.० फूट) उंचीवर वसले आहे. झाग्रेब शहराचे क्षेत्रफळ ३५९.९६ चौरस किमी (१३८.९८ चौ. मैल) इतके आहे.

हवामान

संपादन

झाग्रेबमधील हवामान सागरी स्वरूपाचे असून येथे चारही ऋतू अनुभवायला मिळतात व चारही ऋतूंमध्ये पाउस पडतो.

झाग्रेब साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 19.4
(66.9)
22
(72)
26
(79)
29.4
(84.9)
33.4
(92.1)
37.6
(99.7)
40.4
(104.7)
39.8
(103.6)
32.8
(91)
28.3
(82.9)
25.4
(77.7)
22.5
(72.5)
40.4
(104.7)
सरासरी कमाल °से (°फॅ) 3.1
(37.6)
6.1
(43)
11.3
(52.3)
16.4
(61.5)
21.3
(70.3)
24.6
(76.3)
26.7
(80.1)
26.2
(79.2)
22.3
(72.1)
16.2
(61.2)
9.3
(48.7)
4.4
(39.9)
15.66
(60.18)
दैनंदिन °से (°फॅ) −0.1
(31.8)
2.0
(35.6)
6.2
(43.2)
10.9
(51.6)
15.7
(60.3)
19.1
(66.4)
20.8
(69.4)
20.0
(68)
16.0
(60.8)
10.8
(51.4)
5.7
(42.3)
1.3
(34.3)
10.7
(51.26)
सरासरी किमान °से (°फॅ) −4.0
(24.8)
−2.5
(27.5)
0.9
(33.6)
4.9
(40.8)
9.2
(48.6)
12.7
(54.9)
14.2
(57.6)
13.7
(56.7)
10.4
(50.7)
5.8
(42.4)
1.8
(35.2)
−1.9
(28.6)
5.43
(41.78)
विक्रमी किमान °से (°फॅ) −24.3
(−11.7)
−27.3
(−17.1)
−18.3
(−0.9)
−4.4
(24.1)
−1.8
(28.8)
2.5
(36.5)
5.4
(41.7)
3.7
(38.7)
−0.6
(30.9)
−5.6
(21.9)
−13.5
(7.7)
−19.8
(−3.6)
−27.3
(−17.1)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 48.6
(1.913)
41.9
(1.65)
51.6
(2.031)
61.5
(2.421)
78.8
(3.102)
99.3
(3.909)
81.0
(3.189)
90.5
(3.563)
82.7
(3.256)
71.6
(2.819)
84.8
(3.339)
63.8
(2.512)
856.1
(33.704)
सरासरी पावसाळी दिवस 10.8 10.0 11.2 12.7 13.2 13.6 10.9 10.4 9.8 10.2 12.2 12.1 137.1
सरासरी हिमवर्षेचे दिवस 6 5 4 1 0 0 0 0 0 0 2 5 23
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 59.4 95.7 140.1 175.4 234.0 243.7 281.0 256.0 186.7 130.8 65.6 44.9 १,९१३.३
सूर्यप्रकाशाची टक्केवारी 21 32 38 43 51 52 59 58 50 38 23 17 40.2
स्रोत #1: विश्व हवामान संस्था (संयुक्त राष्ट्रे)[]
स्रोत #2: Croatian Meteorological and Hydrological Service

वाहतूक

संपादन

झाग्रेबमधील शहरी वाहतूक रेल्वे, रस्ते व जलमार्गांचा वापर केला जातो. पारंपारिक व दलद परिवहनासाठी येथे अनेक बस मार्ग, ट्राम व उपनगरी रेल्वे सेवा कार्यरत आहेत. झाग्रेबमधून क्रोएशियातील पाच प्रमुख महामार्ग जातात झाग्रेब विमानतळ हा क्रोएशियामधील सर्वात मोठा विमानतळ झाग्रेब शहरामध्ये स्थित असून क्रोएशिया एरलाइन्स ह्या क्रोएशियाच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा प्रमुख वाहतूकतळ येथेच स्थित आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ "World Weather Information Service". UN. July 2011. 2021-01-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-05-01 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: