चिमूर विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
(चिमुर विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)
चिमूर विधानसभा मतदारसंघ - ७४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, चिमूर मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील १. चिमूर आणि २. नागभीड ही तालुके आणि ३. ब्रह्मपुरी तालुक्यातील अहेर नवरगांव महसूल मंडळ यांचा समावेश होतो. चिमूर हा विधानसभा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे पक्षाचे किर्तीकुमार ऊर्फ बंटी जितेश भांगडिया हे चिमूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती
संपादनचिमूर विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
- चिमूर तालुका
- नागभीड तालुका
- ब्रह्मपुरी तालुका : अहेर नवरगांव महसूल मंडळ
चिमूर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
संपादन- ^ - पोट-निवडणूक
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
चिमूर | ||
उमेदवार | पक्ष | मत |
विजय नामदेवराव वडेट्टीवार | काँग्रेस | ८९,३४१ |
वसंतभाऊ नारायण वारजूरकर | भाजप | ५८,७२५ |
जे.टी. लोंबाळे | बसपा | ११,२०० |
अरविंद आत्माराम संदेकर | अपक्ष | १११० |
प्रभाकर महागुजी दडमल | रिपाई (आ) | १४५८ |
संध्याताई जोगेश्वर वारजूरकर | अपक्ष | ११८४ |
विलासभाऊ डांगे | अपक्ष | ९५० |
QURESHI MOHMMAD IKHALAK | अपक्ष | ६९६ |
Barapatre प्रमोद नागोराव | डेसेपा | ५६४ |
रमेश गणपतराव मडावी | अपक्ष | ४६० |
विजय हिरामण इंदूरकर | प्ररिप | ४४२ |
पेंदाम दिवाकर G. | अपक्ष | ३९२ |
अशोक मारोतराव मुळेवार | अपक्ष | ३३९ |
बाबुराव लक्ष्मण दांडेकर | अपक्ष | २१६ |
हरगोविंद बंगाराम मसराम | गोंगपा | १६२ |
बाह्य दुवे
संपादन- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर चिमूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).