गुणक: 21°13′N 77°43′E / 21.21°N 77.72°E / 21.21; 77.72{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही.

  ?चिखलदरा
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य

२१° १२′ ३६″ N, ७७° ४३′ १२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा अमरावती
भाषा मराठी
तहसील चिखलदरा
पंचायत समिती चिखलदरा
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ++०७२१
• MH27


चिखलदरा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक तालुका आहे. चिखलदरा सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.

आख्यायिकासंपादन करा

चिखलदर्‍याचा मनोरंजक इतिहास आपल्याला अगदी महाभारत काळापर्यंत मागे घेऊन जातो. पांडवांनी वनवासातील काही काळ चिखलदर्‍यात घालवला होता असे म्हणतात. येथे असलेल्या विराटनगरीतील जुलमी आणि भोगी राजा कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराटनगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच कीचकदरा. अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले. ज्या दरीत भीमाने कीचकाला फेकून दिले, ती दरी आणि वरच्या अंगाला ज्या झर्‍यात भीमाने आंघोळ केली ते भीमकुंडसुद्धा पाहायला मिळते.

निसर्गसंपादन करा

चिखलदर्‍याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५६४ फूट आहे. त्यामुळे तेथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते. मेळघाट रांग ही व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित केल्यामुळे येथे वाघांच्या शिकारीला बंदी आहे. चिखलदर्‍याच्या घाटात किंवा चिखलदर्‍याहून सेमाडोहला जाणार्‍या रस्त्यावर वाघ दिसू शकतात. मोर, रानकोंबडा, अस्वले तर बर्‍याच मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र सह्याद्रीतल्या सदाहरित जंगलांसारखी घनदाट हिरवीगार झाडी येथे दिसत नाही. येथील जंगल शुष्क पानझडीच्या अरण्याच्या प्रकारात मोडते. कॉफी हे येथील मुख्य उत्पादन आहे. कॉफीला लागणारे ७० ते ८० फॅरनहाइट तापमान येथे लाभते.

प्रेक्षणीय स्थळेसंपादन करा

चिखलदर्‍याला विदर्भाचे नंदनवन असे म्हणतात.

( चिखलदरा येथील बहुतेक स्थळांची नावे ब्रिटिश अधिकार्‍यांनी दिलेली आहेत.)

 1. पंचबोलचे नाव इको पॉईंट.
 2. देवी पॉईंट
 3. नर्सरी गार्डन
 4. प्रॉस्पेट पॉईंट
 5. बेलाव्हिस्टा पॉईंट
 6. बेलेन्टाईन पॉईंट
 7. भीमकुंड‎
 8. मंकी पॉईंट
 9. लॉग पॉईंट
 10. लेन पॉईंट
 11. वैराट पॉईंट
 12. हरिकेन पॉईंट

बाह्य दुवेसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
अमरावती जिल्ह्यातील तालुके
चांदुर बाजार | चांदुर रेल्वे | चिखलदरा | अचलपूर | अंजनगाव सुर्जी | अमरावती तालुका | तिवसा | धामणगांव रेल्वे | धारणी | दर्यापूर | नांदगाव खंडेश्वर | भातकुली | मोर्शी | वरुड