वैराट पॉइंट (चिखलदरा)

(वैराट पॉईंट या पानावरून पुनर्निर्देशित)

वैराट हा चिखलदऱ्यातील रेंजर प्रशिक्षण कॉलेजकडील एक प्रमुख पॉईंट असून तो चिखलदऱ्यापासून ८ कि. मी. अंतरावर आहे. मेळघाटातील हा सर्वात उंच पॉईंट आहे. वैराटकडे जाताना दोन्ही बाजूकडे सातपुड्याच्या उंच-उंच पर्वतरांगा नजरेत पडतात. येथे महाभारतकाळात वैराट राजाची नगरी होती म्हणून या जागेला वैराट असे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. वैराट या उंच ठिकाणावरून सूर्यास्त पाहताना निसर्गाचं आगळं वेगळं रूप पहायला मिळतं.