भीमकुंड, चिखलदरा
(भीमकुंड या पानावरून पुनर्निर्देशित)
भीमकुंड ही ऐतिहासिक जागा चिखलदरा गावापासून साधारणत: एक ते दीड किलोमीटरवर आहे. धामणगाव मार्गे रस्त्याने चिखलदर्यास जाताना हे ठिकाण लागते. त्यासमोर साधारण ३५०० फूट खोल दरी आहे. डाव्या हाताला दरीच्या सुरवातीला भीमकुंड हा झरा आहे. याला कीचकदरा असेही संबोधतात. महाभारतात भीमाने कीचक नावाच्या राक्षसाचा वध येथे केला व वधानंतर या कुंडात हात धुतले, अशी आख्यायिका आहे.[१]