चहाडे
चहाडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे.
?चहाडे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
गुणक: Coordinates: Unknown argument format |
|
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | पालघर |
सरपंच | |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• +०२५२५ • महा४८ |
भौगोलिक स्थान
संपादनपालघर रेल्वे स्थानकापासून मनोर राज्य महामार्गावर १० किमी अंतरावर हे गाव स्थित आहे.वाघोबा खिंड पार केल्यानंतर लगेचच ह्या गावाची हद्द चालू होते.
हवामान
संपादनयेथे हिवाळ्यात थंडगार वातावरण असते आणि वाघोबा खिंडीतून जाताना भरपूर धुके अनुभवायला मिळते. पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे जागोजागी झरे तयार झालेले असतात आणि त्यामध्ये नैसर्गिकरीत्या मासे पैदास होते.उन्हाळ्यात येथे उष्ण हवामान असते.
लोकजीवन
संपादनहे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५०६ कुटुंबे राहतात. एकूण २२९३ लोकसंख्येपैकी ११६० पुरुष तर ११३३ महिला आहेत. गावाची साक्षरता ७१.३३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८०.७१ आहे तर स्त्री साक्षरता ६१.९० आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३२९ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १४.३५ टक्के आहे.मुख्यतः कुणबी, आदिवासी समाजातील लोक येथे पिढ्यानपिढ्या स्थायिक आहेत.खरीप हंगामातील भातशेती, नागलीशेती बरोबरच रब्बी हंगामात फुलभाज्या, फळभाज्या, पालेभाज्या ह्यांचे उत्पादन घेतले जाते. सूर्या नदी गावाजवळून वाहत असल्याने आणि बारमाही पाणी उपलब्ध झाल्याने काकडी, पडवळ,दुधी,गलका, कारले, केळी, आळू,शिराळा, कोबी, कांदा, मिरची ह्यांचे भरपूर प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत.येथे सगळ्या परिसरात भात पिकत असल्याने परंपरेने तेच मुख्य अन्न आहे. रोजच्या जेवणासह सण, उत्सव, प्रथा, परंपरा यात भाताचे स्थान अनन्यसाधारण आहे. ताटात घरी पिकविलेल्या भातावर माशाचे कालवण पडल्यावरच येथील माणसांचे पोट भरते. भात किंवा तांदळापासून बनविलेले अनेक पदार्थ आहारात वापरतात.कणेरी, रवळी,रोळी, थालकुली, सानं, पोवं, ओतवल्याची भाकर, पानोल्या, पानमोड्या, पीठीचे लाडू, कोंडी, पापड्या, कुरडया, खरवड्या हे सगळे पदार्थ तांदूळापासून बनविले जातात.
नागरी सुविधा
संपादनयेथे प्राथमिक शिक्षणाची सोय आहे.गावात सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. माध्यमिक, उच्च माध्यमिक, उच्च शिक्षण तसेच न्यायालयीन कामकाज, महसूल कामकाजासाठी पालघर येथे जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते.
संदर्भ
संपादन१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036