चर्चा:हिंदूंचा छळ

Latest comment: २ वर्षांपूर्वी by अभय नातू in topic बदल

बदल

संपादन

@Katyare: नमस्कार, कृपया लेखात योग्य ते संदर्भ जोडावेत. तसेच आंतरविकी दुवे जोडताना जे मराठी विकिपीडियावर उपलब्ध आहेत तेच जोडावेत. सदरील लेखात मोठ्या प्रमाणात लाल दुवे दिसत आहेत, जे की अपेक्षित नाहीये. लेख नवीन आहे म्हणून लेखात बदल किंवा इतर साचे जोडले नाही.- संतोष गोरे ( 💬 ) १६:५२, १६ मार्च २०२२ (IST)Reply

तसेच आंतरविकी दुवे जोडताना जे मराठी विकिपीडियावर उपलब्ध आहेत तेच जोडावेत.
मग नवीन पाने कधीच तयार होणार नाहीत! काम चालू आहे.
वेळ मिळेल तसे लाल दुवे निळे होतील.
आणी इतकेच वाईट वाटते आहे तर तुम्ही लिहा ही पाने - कुणी अडवले आहे?
नुसते हिंदुंचा छळ हे पान बनवले तरी तुम्हाला इतका त्रास का होतो आहे हे समजले नाही? आधी कधी विरोध नाही केला? निनाद ०२:५५, १७ मार्च २०२२ (IST)Reply
नमस्कार, आपण हे सौम्य भाषेत नमूद करू शकत होतात. कृपया शांतपणे हे लक्षात घ्यावे की द काश्मीर फाइल्स, काश्मिरी पंडितांचे पलायन, जम्मू-काश्मीर मधील उग्रवाद हे व इतर पाने मी पण लिहिलीत. परंतु याचा अर्थ हा होत नाही की दात ओठ खाऊन आपल्या मनातली भडास येथे काढावी. तुम्ही लेख लिहा पण त्यात निष्पक्षपणा असावा, रागाच्या भरात लेख भरकटू नये इतकेच अपेक्षित आहे. अपेक्षा आहे की माझ्यावर राग काढलात तिथपर्यंत ठीक आहे पण लेख लिहिताना तो मुद्देसूद असावा. पुढील लेखनास शुभेच्छा.- संतोष गोरे ( 💬 ) ०९:१८, १७ मार्च २०२२ (IST)Reply
धन्यवाद!
खरंय..! समजून घेतल्याबद्दल आभार! :)
आपल्यालाही पुढील लेखनास शुभेच्छा! निनाद १०:४७, १७ मार्च २०२२ (IST)Reply

लेख संदर्भासहीत लिहिला जात आहे. तेव्हा हा लेख उल्लेखनीय नाही असा साचा येथे लावू नये ````

@Katyare: नमस्कार, कृपया वरील जुनी चर्चा पहावी, तसेच लेखाच्या हिशोबाने संदर्भ देखील किती जोडल्या गेलेत आणि लाल दुवे किती कमी केलेत ते पहावेत. आपण या लेखा नंतर तब्बल ११ नवीन लेख लिहिले आहेत. तेव्हा आपणच सांगावेत की प्रचालक किंवा इतर मंडळींनी एखादा सुचालन साचा कधी लावावा? लेख संदर्भासहीत लिहिला जात आहे असे आपण म्हणताय म्हणजे हा लेख अजून किती काळ लिहिला जाणार आहे? विशेष म्हणजे जेव्हा कोणी प्रचालक एखाद्या लेखास सुचालन साचा लावतो तेव्हा आपण कोणताही प्रश्न न विचारता किंवा कोणतीही दुरुस्ती न करता स्वतःच सुचालन साचा काढणे योग्य आहे का? अपेक्षा आहे की आपण योग्य ते सहकार्य कराल.-संतोष गोरे ( 💬 ) १४:३२, ११ सप्टेंबर २०२२ (IST)Reply
@संतोष गोरे: हिंदूंचा छळ या लेखाचे कार्य अजूनही चालले आहे, पण जरा मदत हवी आहे. गोवा इन्क्विझिशनचा लेख लिहायला मदत करता का? गोवा इन्क्विझिशन या शब्दांचे मराठी भाषांतर करावे का; हा ही एक प्रश्न आहे. धन्यवाद!
नमस्कार, गोवा इन्क्विझिशन या इंग्रजी लेखाचे आपण भाषांतर करू शकता. 'गोवा इन्क्विझिशन' हा शब्द इंग्रजी आणि मराठी लिपीतून गूगल केला असता मला केवळ मराठी विश्वकोशात गोवा, दमण, दीव हा एकमेव लेख सापडला ज्यात गोवा इन्क्विझिशन ला पर्यायी शब्द म्हणून 'धर्मन्यायपीठ' असा मिळाला. बाकी सर्वत्र इंग्रजी लिप्यंतर दिसून येत आहे. तेव्हा या लेखाचे नाव 'गोवा इन्क्विझिशन' असेच ठेवून त्यास मराठी पुनर्निर्देशन द्यावे असे मला वाटते. यात @अभय नातू: यांचा सल्ला घेणे अधिक सोयीस्कर ठरेल.-संतोष गोरे ( 💬 ) ०९:५१, २० सप्टेंबर २०२२ (IST)Reply
सहसा Inquisition शब्द (गुन्ह्याची) खोल चौकशी या अर्थाने वापरला जातो. कॅथोलिक धर्माने, विशेषतः स्पेनमध्ये, केलेल्या इन्क्विझिशनांना विशेष अर्थ मिळालेला आहे. यांमध्ये अधर्मी, निधर्मी आणि तथाकथित धार्मिक गुन्हेगारांचा अतीव छळ केला गेला होता व त्यांच्याकडून (अनेकदा) खोटे कबूलीनामे लिहून घेतलेले होते.
यासा समर्पक मराठी शब्द लगेचच सुचत नाही, तरी सध्या इन्क्विझिशन शब्द ठेवावा परंतु लेखात स्पष्टपणे याला प्रतिशब्द पाहिजे असल्याची नोंद करावी.
अभय नातू (चर्चा) १०:१३, २० सप्टेंबर २०२२ (IST)Reply
इन्क्विझिशनांना विशेष अर्थ मिळालेला आहे. यांमध्ये अधर्मी, निधर्मी आणि तथाकथित धार्मिक गुन्हेगारांचा अतीव छळ केला गेला होता व त्यांच्याकडून (अनेकदा) खोटे कबूलीनामे लिहून घेतलेले होते. हा मुद्दा आहे खरा. 'गोवा इन्क्विझिशन' हाच शब्द योग्य वाटतो. @संतोष गोरे: बनवा की हा येव्हढा एक लेख!
"हिंदूंचा छळ" पानाकडे परत चला.