चर्चा:शुद्धलेखनाचे नियम
- ता.क.:पुढील नियम आपल्या सदस्य पानावर किंवा चर्चा पानावर एका वेळी एक पहाण्या करिता {{शुद्धलेखन}} हा साचा लावावा.
प्रिय विकिसदस्य, आपल्याला माहित आहे का की
जसे आपणास विदित असेल, मराठी विकिप्रकल्पांच्या अचूकतेस हातभार लागावा म्हणून वेळोवेळी शुद्धलेखनात गती असलेल्या सदस्यांनी मोठेच योगदान केले आहे.फायरफॉक्स शुद्धलेखन चिकित्सक आणि सांगकामे(बॉट्स)तंत्रज्ञानाचे पाठबळसुद्धा तज्ञ सदस्यांनी पुरवून मराठी विकिप्रकल्पांना झळाळी देण्याचे काम करत आहेत. तरीसुद्धा आपल्याला मराठीत केलेले लेखन जतन करण्यापूर्वी किंवा इतरांनी केलेले लेखन फायरफॉक्स शुद्धलेखन चिकित्सकाकडून किंवा गमभन शुद्धलेखन चिकित्सकाकडून तपासून घेता येईल; मराठी विकिपीडियाच्या अचूकतेत भर पडेल .मराठी विकिप्रकल्पात दर्जेदार आणि समृद्ध माहितीचा साठा तयार व्हावा म्हणून आपणास अमूल्य सहकार्याची सादर विनंती आहे.या संदर्भात खालील दूवेसुद्धा अभ्यासावेत हि नम्र विनंती
आपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
हेसुद्धा पहा
संपादन- मराठी शुद्धलेखन
- अशुद्धलेखन
- मराठी साहित्य महामंडळाचे पुरस्कृत शासनमान्य शुद्धलेखनाचे नियम
- परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे
- भाषाशुद्धी चळवळ
- विरामचिन्हे
- पद
- मराठी व्याकरण
- वर्ग:शुद्धलेखन
- विक्शनरी प्रकल्पाकडे
- सांगकाम्या
- मला मराठी विकिपीडियात अशुद्ध लेखन आढळते काय करावे?
- मराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते?
- मराठी व्याकरण,शुद्धलेखन,शब्दकोश इत्यादी साहित्याची संदर्भ सूची
शाब्बास!
संपादनमाहितगार, अनामिक लेखक
अतिशय महत्त्वाच्या लेखाला सुरुवात केल्याबद्दल अभिनंदन! आताप्र्यंतच्या लेखाची मांडणी उदाहरणे दिल्यामुळे समजण्यास सोपी झाली आहे. पुढचा भागही असाच वाचनीय असेल अशी अपेक्षा आहे. :-)
--संकल्प द्रविड 05:21, 29 ऑगस्ट 2006 (UTC)
शाब्बास
संपादनWhat he said :-)
अभय नातू 05:23, 29 ऑगस्ट 2006 (UTC)
Tatsam Shabd
संपादनMarathi Shuddhniyamanchya lekhabaddal abhinandan. he niyam lakshat theun vaaparanyaacha nakkich prayatan karin . Pan lahanpahnipaasun mala ek gosht kadhich kalali naahi. " Tasam shabd sanskritmadhye rhaswant-dirghant aahet he kalanyaasathi kaahi niyam aahet ka? marathiche niyam nehami tatsam shabdaaancha sandarbh det asalyaane sanskritmadhye tatsam shabd kase lihle jaatat yabaddal mahiti kuthe milel?
कोल्हापुरी 09:20, 1 सप्टेंबर 2006 (UTC)
- What you say is very correct
- Which one is tatsam?
- If it is tatsam what rule is applied in Sanskrit?
Just I am also searching just like you, In fact recently I went to A.B.C.-pune to serch for "Paribhashik Shabd " book I did not find one but I found a few for shuddha lekhan kosh but that does not give answer to questions in our mind .
And the way Maayboli ,and Manogat are graced by expert people with their knowledge wikipedia is not, any way I will continue my search and work for mr wiki on this front 'yatha shakti' and keep you updated. Thanks to all who complemented me ,I hope more join in this effort because Wiki software gives best justice is for certain. Mahitgar 13:05, 1 सप्टेंबर 2006 (UTC)
- And the way Maayboli ,and Manogat are graced by expert people with their knowledge wikipedia is not...
- Not true! We've got you!!
- And a bunch of other people.
- अभय नातू 15:12, 1 सप्टेंबर 2006 (UTC)
temp
संपादनअशी काही व्यवस्था येथे नाही काय कि एखादा मराठी शब्द सिलेक्ट केल्यावर त्याचे शुद्धलेखन असलेले शब्द समोर येतील. असल्यास कृपया सांगावे अशी नम्र् विनंती करते. जसे गुगल् मध्ये आहे. -चिबू
शुध्दलेखनाच्या नियमांविषयी:
संपादनसध्या मराठी भाषा ज्या पध्दतीने बोलली वा लिहिली जाते; तीत जे शब्द आहेत, त्यांना मरठीचे म्हणून मान्यता द्यावी.(तत्सम, तद्भव, परभाषी) असे कुठलेच भेद ठेवू नयेत. आणि नंतर नियम तयार करावेत. ज्यामुळे ती सोपी सुटसुटीत होईल. असे वाटते. -उध्दव दराडे, पैठण. उध्दव दराडे (चर्चा) ०६:५४, १९ जानेवारी २०१८ (IST)
शुद्धलेखनाबाबत इतर ठिकाणी झालेल्या चर्चांचे येथे खाली एकत्रीकरण केले आहे
सदस्य:Tiven यांचेसोबत त्यांचे चर्चापानावर झालेली चर्चा
संपादन(येथे नकल-डकव केली आहे.) 'विमानतळ'चे अनेकवचन विमानतळे होत नाही, ते विमानतळच असायला हवे. अकारान्त पुल्लिंगी शब्दाचे अनेकवचन करताना मूळ शब्द तसाच राहतो. उदा० माठ, घाट, तुरुंग, प्रभाव, लेखक, मालक, उठाव, पत्रसंवाद, गाडीतळ, तिरस्कार, सारीपाट, वगैरे शब्दांची अनेकवचने माठ, .... संवाद... सारीपाट अशीच होतात. (तळ हा शब्द पुल्लिंगी आहे!)
अकारान्त नपुंसकलिंगी शब्दांची अनेकवचने करताना शेवटच्या 'अ'चा 'ए' होतो. घर-घरें, बेट-बेटें, माणूस-माणसें, निरीक्षण-निरीक्षणें, आत्मकथन-आत्मकथनें, वगैरे. अनेकवचनी रूपांतल्या अंत्याक्षरावरचा अनुस्वार १९६२च्या (अ)शुद्धलेखनाच्या नियमाने बंद झाला, तरी बोलीभाषेत तो अनुस्वार चालूच राहिला. उदा० घरं, माणसं, निरीक्षणं, आत्मचरित्रं, वगैरे. ....ज (चर्चा) १८:५४, २८ डिसेंबर २०१८ (IST)
अधिक चर्चा
संपादनअश्याच प्रकारचे दोष हे चुकीचे मराठी आहे. असा प्रकार->असे प्रकार->अशा प्रकारचे->अशा प्रकारांचे. प्रकार हा शब्द पुल्लिंगी आहे, म्हणून अश्याच हे स्त्रीलिंगी रूप होणार नाही.
अशी स्त्री->अश्या स्त्रिया
असे पुस्तक->अशी पुस्तके->अशा पुस्तकाने->अश्या पुस्तकांनी .. ज (चर्चा) १६:०२, ७ सप्टेंबर २०१६ (IST)
मराठीत अनेकवचनासाठी खालील नियम आहेत :
आ-कारान्त पुल्लिंगी शब्दाचे अनेकवचन ए-कारांत होते. उदा० पिता-पिते, आत्मा-आत्मे, कोल्हा-कोल्हे, रस्ता-रस्ते, चुलता-चुलते, भाचा-भाचे, आजा-आजे, पुतण्या-पुतणे वगैरे. अपवाद - काका, मामा, दादा यांची अनेकवचनी रूपे काका, मामा, दादा अशीच होतात. असे असले तरी, अनादर दाखवण्यासाठी काके-मामे-बापदादे अशी अनेकवचने होतात. तुमचे बापदादे कधी घोड्यावर बसले होते का?. तुमचे काम विनामोबदला करायला हे कोण तुमचे काके मामे लागून राहिलेत का? वडील आणि आजोबा या आदरार्थी अनेकवचनी शब्दांना एकवचन नाही.
आ-कारान्त सोडून अन्य पुल्लिंगी शब्दांचे एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच असतात. उदा० देव, स्तंंभ, खांब, सुतार, उंदीर, दगड (अ-कारान्त); कवी, अग्नी, पक्षी, न्हावी, कोळी, धोबी (ई-कारान्त), हेतू, शत्रू, पेरू, लाडू, भाऊ (ऊ-कारान्त), टाहो, खोखो, फोटो, फोनो (ओ-कारान्त) हे शब्द अनेकवचन होताना तसेच राहतात.
स्त्रीलिंगी शब्दांची अनेकवचने :
संस्कृत शब्द : अस्त्रविद्या, फलाशा, पाठशाला, चालीरीती, भीती, नारी, सुवासिनी आपत्ती, कृती, वधू या शब्दांचे अनेकवचन होताना मूळ शब्दात बदल होत नाही. अपवाद - नदी-नद्या, स्त्री-स्त्रिया, मादी-माद्या. मराठी शब्द : पाच प्रकार - १. माती-माती, रेती-रेती, गर्दी-गर्दी, सर्दी-सर्दी; २. भाकरी-भाकर्या, काठी-काठ्या, बी-बिया, भुवई-भुवया ३. वीट-विटा, चिंच-चिंचा. सून-सुना, ४.. भिंत-भिंती, वाघीण-वाघिणी, जात-जाती; ५. सासू-सासवा, जाऊ-जावा, पिसू-पिसवा वगैरे.
तेव्हा आपत्तीचे अनेकवचन आपत्ती हेच बरोबर, आपत्त्या नाही. ... ज (चर्चा) १५:३७, ३० जानेवारी २०१७ (IST)
अध्यक्ष, राष्ट्रपती, ग्रंथपाल इत्यादींची स्त्रीलिंगी रूपे अनुक्रमे अध्यक्षा, राष्ट्रपत्नी, ग्रंथपालिका अशी होत नाहीत, निदान अशी करू नयेत. ‘मास्तरीण’प्रमाणे अध्यक्षीणबाई होईल, पण अध्यक्षा होऊ नये. ग्रंथपालचे पुल्लिंग ग्रंथसरडा होत नाही; माशीचे पुल्लिंग माशा किंवा मासा होत नाही; सशाचे स्त्रीलिंग सशी होत नाही. निष्कर्ष असा की प्रत्येक पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंग होतेच असे नाही, आणि प्रत्येक स्त्रीलिंगी शब्दाला पुल्लिंग असतेच असे नाही. ... ज (चर्चा) १६:३६, ९ फेब्रुवारी २०१७ (IST)
ग्रंथपालचे पुल्लिंग ग्रंथसरडा होत नाही.:-D :-D :-D
अयने हेच योग्य. अयन म्हणजे शास्त्र (उदा० रंगायन, ज्योति़षायन), मार्ग, काळ, कक्षा, सहा महिन्यांचा काळ, वगैरॆ.... ज (चर्चा) २२:४६, १३ मार्च २०१७ (IST)
पान सुरक्षित करण्याची विनंती
संपादनहे पान विकिपीडियाच नव्हे तर अनेक ठिकाणी प्रमाण लेखन करण्यासाठी संदर्भ आणि दिशादर्शक म्हणून वापरले जाते. त्यामुळे हे पान संचालकांनी सुरक्षित करावे ही विनंती. मंदार १ (चर्चा) २३:१०, ३ ऑगस्ट २०२३ (IST)