चर्चा:शिलालेखशास्त्र

Latest comment: १ वर्षापूर्वी by Sandesh9822 in topic संदर्भ

संदर्भ संपादन

@Sandesh9822: सर या पानांमध्ये माहिती आणि संदर्भ सहित जोडण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. पुढे जाण्याच्या अगोदर मी एक चर्चासत्र पाहिलं आहे. [१] त्या चर्चासत्रामध्ये @Usernamekiran: सरांशी तुम्ही उत्तर देताना बारावी इतिहासाचा संदर्भ तुम्ही दिलेलं आहे मला थोडी माहिती कळेल का ? बारावीच्या इतिहासाच्या कोणत्या पानावरील माहिती आहे ते संदर्भ मी येथे जोडण्याचा प्रयत्न करेन. AShiv1212 (चर्चा) १६:३४, ४ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

@अभय नातू: सर. सहा दिवसापूर्वी मी या प्रचालकांना ping करून इतिहासाच्या कोणत्या पानावर ही माहिती आहे. असं विचारलेलं होतं पण मला सहा दिवस होऊन सुद्धा त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

हे आहे इतिहासाचे बारावीचे पुस्तक.[२] या पुस्तकामध्ये असे कोणतंही धडा किंवा माहिती उपलब्ध नाही.@Usernamekiran: AShiv1212 (चर्चा) १७:०३, १० नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

@AShiv1212: नमस्कार, सदर लेख मी २०१७ मध्ये लिहिलेला आहे. आणि तुम्ही जे वर पुस्तक दिले आहे ते २०२० मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाले आहे. अर्थात मी जुन्या बारावीच्या पुस्तकातून मजकूर घेतलेला आहे. कृपया, जुने बारावीचे पुस्तक उपलब्ध झाल्यास येथे सादर करावे, मी संदर्भ लगेच दाखवून देईल. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १९:२८, १० नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

@Usernamekiran आणि AShiv1212: शिलालेखशास्त्र तसेच आलेखशास्त्र या लेखांमध्ये मी २०१७ मध्ये जोडलेल्या मजकूरास 'चुकिचा ठरवून' त्याला दोन्ही लेखांतून काढण्यात आले होते. मी तेव्हा वापरलेले संदर्भ साहित्य मला सध्या उपलब्ध झाले आणि सदर लेखांमध्ये तो संदर्भ जोडत हटवलेला मजकूर पुनर्स्थापित केला आहे. AShiv1212 येथे स्त्रोत पुन्हा देत आहे.

  • पुस्तक : उपयोजित इतिहास (इयत्ता १२वी)
  • प्रकाशन : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
  • प्रकाशक : कृष्णकुमार पाटील (सचिव), अभ्यास मंडळ, महाराष्ट्र शासन
  • प्रथमावृत्ती : २०१३
  • पुनर्मुद्रण : २०१५
  • धडा : पहिला - २१वे शतक आणि उपयोजित इतिहासाचे महत्त्व
  • पान क्र.‌ २

अजूनही या पुस्तकाचे प्रत्यक्ष संदर्भ पान पाहण्याची इच्छा असेल माझ्या ईमेल आयडी वर संदेश पाठवावा, तुम्हाला पुस्तकाचा फोटो पाठवला जाईल. माझ्या सदस्य पानावर माझी ईमेल आयडी आहे. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २०:२४, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

संदेश सरांनी आता म्हणाले की संदर्भ पाहायचा असेल तर ई-मेलच्या माध्यमातून ते दाखवायला तयार आहेत पण अशा पद्धतीचं विकिपीडियाचा कोणताच नियम सांगत नाही. संदर्भ हा लोकांना दिसण्यासाठी आणि सार्वजनिक असावा. हा संदर्भ दिसत नाही. अशा संदर्भांना विकिपीडियावर जर मान्यता असेल तर कोणी पण खोटी माहिती आणि अशा प्रकारचं संदर्भ जोडू शकत.

सर्व प्रचालकांना नमस्कार @अभय नातू, Tiven2240, Usernamekiran, संतोष गोरे, Rahuldeshmukh101, Abhijitsathe, QueerEcofeminist, सुभाष राऊत, आणि V.narsikar: संदेश सरांनी जो संदर्भ जोडलेला आहे तो संदर्भ मला पाहायचा आहे. आणि संदर्भ मागण्याचा अधिकार विकिपीडियावर समावेश असणाऱ्या सर्व सदस्यांना आहे. जसा त्यांनी जोडलेला आहे तसा त्यांनी उपलब्ध करून द्यावा पाहण्यासाठी. आणि हा संदर्भ सार्वजनिक असावा सर्वांना पाहण्यासारखा फक्त मला ईमेलच्या माध्यमातून पाठवण्यासारखा नसावा. अन्यथा पानांमध्ये जोडलेली माहिती आणि संदर्भ हे हटवावी अशी मी विनंती करत आहे.

अशा संदर्भांना तुमची सहमती असेल तर मराठी विकिपीडियाच्या इतिहासामध्ये जेवढे पान डिलीट करण्यात आलेले आहेत. ते सर्व पान मी उद्यापासून पुन्हा बनवायला सुरुवात करेल. AShiv1212 (चर्चा) २०:३६, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

@अभय नातू: कृपया लक्ष घालावे.
@Sandesh9822: तुम्हाला संबंधित पानाची संचिका चढवता येणार नाही का?-संतोष गोरे ( 💬 ) ०८:०९, १२ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply


@संतोष गोरे: सदर पान संचिका म्हणून अपभारित केल्यास प्रताधिकार भंग ठरू शकतो. @अभय नातू आणि Tiven2240: संबंधित पानाची संचिका "मराठी विकिपीडियावर तात्पुरती" चढवावी का? --संदेश हिवाळेचर्चा ०८:५४, १२ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply
  • mi saddhya gavabaher ahe. Pan या लेखांमध्ये मी २०१७ मध्ये जोडलेल्या मजकूरास 'चुकिचा ठरवून' त्याला दोन्ही लेखांतून काढण्यात आले होते. He chukiche ahe. Mi fakt eka lekhatil mahiti kadhli hoti. Dusri adchan mhanje, 12vi ch pustak nemk konta sandarbh deto? शिलालेखशास्त्र ki आलेखशास्त्र? —usernamekiran (talk) १३:२५, १२ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply
नमस्कार, केवळ एका लेखातील माहिती तुमच्याद्वारे काढण्यात आली होती, हे मला माहिती आहे. आणि दुसऱ्या एका लेखातील माहिती अलीकडेच AShiv1212 सदस्याने काढली होती. सदर पुस्तकाच्या क्र. २ पानावर शिलालेखशास्त्र आणि आलेखशास्त्र या दोन्हींचे संदर्भ आहेत. --संदेश हिवाळेचर्चा १४:०६, १२ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply
@Sandesh9822:
येथे दिलेल्या संदर्भाचा प्रताधिकार कोणाकडे आहे?
अभय नातू (चर्चा) ०१:१०, १४ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply
@अभय नातू: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे --संदेश हिवाळेचर्चा ०९:५७, १४ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply
"शिलालेखशास्त्र" पानाकडे परत चला.