शिलालेख हे इतिहासाचे प्राथमिक आणि विश्वसनीय असे साधन आहे. शिलालेखांच्या अभ्यास करणाऱ्या शास्त्राला शिलालेखशास्त्र (Epigraphy) असे म्हणले जाते. शिलालेखांचा अभ्यास करताना त्यावरील ऐतिहासिक नोंदींचा अभ्यास केला जातो. शिलालेखांच्या अभ्यासामुळे समकालीन घटनांसंबंधी अधिकृत माहिती मिळते.[]

शिलालेखशास्त्र हे शास्त्र भाषाशास्त्र (Philology) व हस्ताक्षरशास्त्र (Palaeography) यांना अतिशय जवळचे आहे. या शास्त्रांच्या आधारे अनेक शिलालेख वाचता येतात व त्यांच्या आधारे नवीन माहिती मिळू शकते, शिलालेख व ताम्रपट ही इतिहासासाठी अतिशय उपयुक्त अशी विश्वसनीय साधने मानली जातात. महत्त्वाच्या घटना पूर्वी शिलालेखात नमूद केल्या जात. हे लेख संक्षिप्त स्वरूपाचे असले, तरी त्यावरील नोंदी स्पष्टपणे व निःसंदिग्धपणे, कोणतीही खाडाखोड न करता केलेल्या असतात. त्यावर घटनेप्रमाणे काळाचीही नोंद असते. यामुळे व हा पुरावा समकालीन असल्यामुळे विश्वसनीय मानला जातो. शिलालेख हे एकाच व्यक्तीने लिहिलेले नसतात, त्यामुळे त्यांनी वापरलेले शब्दप्रयोग, वाक्प्रचार भिन्न स्वरूपाचे असू शकतात. या शास्त्राचा उपयोग सांगताना प्रो. रेनियर म्हणतात, ऐतिहासिक घटनांचा शोध लावण्यासाठी संशोधकाला सदरचे पुरावे ज्या भाषेत लिहिले आहेत तिची सखोल माहिती आवश्यक आहे. तसेच शिलालेख लिहीत असताना ज्या संक्षिप्त रूपांचा वापर केला आहे ती पद्धती माहीत असणे आवश्यक आहे.[]

ह्या शिलालेखावरील व ताम्रपटावरील कोरलेले शब्द ब्राम्ही, खरोष्टी अशा प्राचीन लिपीत असतात. ह्या लिपींचा उलगडा झाल्याशिवाय त्यांचा अर्थ लागत नाही. ब्राम्ही लिपीची उकल इंग्लिश ईस्ट इंडियाच्या शासनकाळातील ब्रिटिश अधिकारी जेम्स प्रिन्सेप ह्या शिलालेखतज्ज्ञाने परिश्रमपूर्वक केली.[]

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ महाराष्ट्र शासन (२०१३). "प्रथम : २१वे शतक आणि उपयोजित इतिहासाचे महत्त्व". उपयोजित इतिहास (इयत्ता १२वी). पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे. pp. २.
  2. ^ "संशोधन पद्धती आणि इतिहासाची साधने" (PDF). mu.ac.in (Marathi भाषेत). 10 November 2022. p. 48. 10 November 2022 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 10 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "ब्राह्मी लिपी संशोधक जेम्स प्रिन्सेप". loksatta.com (Marathi भाषेत). 12 November 2018. 10 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

हे सुद्धा पहा

संपादन