हस्ताक्षरशास्त्र पॅलिओग्रॉफी म्हणजे जुन्या हस्ताक्षरांचा अभ्यास करणारे शास्त्र होय. अनेक अक्षरे कसकशी विकसित होत गेली याचा अभ्यास केला जातो. प्रत्येक शब्द किंवा अक्षर हे प्रत्येक व्यक्तीच्या हस्ताक्षरामध्ये कालांतराने बदलत जाते. या शास्त्रामध्ये स्थळ व काल यामध्ये प्रत्येक शब्दाचा कसा विकास झाला यांचा अभ्यास केला जातो. हस्ताक्षरतज्ज्ञ (Paleographer) ही जुनी कागदपत्रे व शिलालेख नुसतेच वाचतो असे नव्हे तर प्रत्येक अक्षराचा विकास कसा झाला याची माहिती देतो. शिक्षणक्रमामध्ये प्रत्येक अक्षर ठराविक कालखंडामध्ये बदलत असते. उदा. पूर्वी ल' हे अक्षर असे काढत असत तर हल्ली हेच अक्षर 'ल' असे काढले जाते. पूर्वी 'काही यापैकी दोन्ही अक्षरांवर अनुस्वार देत असत तर हल्ली दोन्ही अनुस्वार काढून टाकलेले आहेत. ज्याप्रमाणे एखादी भाषा एकाच जमातीचे लोक अनेक प्रकारानी लिहितात तसेच एखादी भाषा अनेक जमातीतील लोक अनेक प्रकारांनी लिहितात.. तेव्हा हस्ताक्षरतज्ज्ञाला नुसते अक्षर पाहूनसुद्धा तो शब्द कोणी लिहिला असेल याची कल्पता येऊ शकते. हस्ताक्षरतज्ज्ञ हा अनेक संक्षिप्त रूपांचा (Abbreviation) अभ्यास करत असतो. हस्ताक्षरशास्त्राच्या अभ्यासाने संशोधकाची बुद्धी जास्त तीक्ष्ण बनते. तसेच अनेक गूढ प्रश्न सुटतात. या शास्त्रामुळेच अनेक गूढ प्रश्न सुटू शकतील. उदा. तंजावर येथील बहदीश्वर मंदिराच्या शिलालेखावरून मराठ्यांची अधिक माहिती समजते.

मानव जसा जसा विकसित होऊ लागला तसे त्याच्या अक्षर रचनेत देखील परिवर्तन होत गेले. हे परिवर्तन वेगाने आणि सर्वत्र सारख्याच पद्धतीने झाले असे मात्र नाही. यामुळे अक्षरांच्या रचनेवरून ते कोणत्या प्रदेशातील असेल हे त्याच्या अभ्यासावरून निश्चित होऊ लागले. यामुळे संबंधित काळ कोणता होता आणि तत्कालीन समाजाची स्थिती कशी होती हे निश्चित करणे सोपे जाऊ लागले. नाणी, शिक्के, शिलालेख, आणि अभिलेख व ग्रंथ यात असलेल्या अक्षरांच्या समाजातील सांस्कृतिक, धार्मिक बाबीचाही उलगडा करण्याचा प्रयत्न करता येतो. लिपिशास्त्रात केवळ लिपिचाच अभ्यास होतो मात्र नाही. लेखकाने उपयोगात आणलेल्या सांकेतिक शब्दांचाही अभ्यास हस्ताक्षर शास्त्रात होतो. प्रत्येक लिपित कोणते ना कोणते सांकेतिक शब्द असतातच, जसे इंग्रजीत le. यासारखे सांकेतिक शब्द आहेत. सांकेतिक शब्द कोणत्या काळात निर्माण झाले आहेत हे निश्चित करून लिपिशास्त्राच्या साहाय्याने तत्कालीन लेखन विकासाची स्थिती लक्षात घेता येते. लिपिशास्त्र हे इतिहासातील समाजाची बौद्धिक, शैक्षणिक व लेखन निश्चित करण्याच्या विकास दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे शास्त्र आहे हे निःसंशय!.[]

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ "संशोधन पद्धती आणि इतिहासाची साधने" (PDF). mu.ac.in (Marathi भाषेत). 10 November 2022. pp. 41–42. 10 November 2022 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 10 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)