चर्चा:रफी अहमद किडवई

(चर्चा:रफी अहमद किदवई या पानावरून पुनर्निर्देशित)
Latest comment: ५ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे

@Dharmadhyaksha आणि अभय नातू: मराठीत संदर्भ तपासले असता 'किदवई' हे 'किडवई' असे लिहिले जाते असे आढळले. पहा - रफी अहमद किडवई मार्ग बातमी, मोहसीना किडवई, रशीद किडवई उल्लेख.शीर्षकात उचित ते बदल करावेत.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:४८, ४ डिसेंबर २०१९ (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी: माहितीबद्दल धन्यवाद. मी आवश्यक ते बदल आता केले आहेत. धर्माध्यक्ष (चर्चा) १४:१६, ४ डिसेंबर २०१९ (IST)Reply
@सुबोध कुलकर्णी:,
याच लेखातील टपाल तिकिटावर किदवई असेच आहे. भारतीय टपाल खात्याचा संदर्भ, तो ही प्रस्तुत व्यक्तीला समकालीन (किंवा त्यांच्या मृत्युपश्चात काही वर्षांतील), हा दैनिक लोकमतपेक्षा अधिक अधिकृत ठरावा.
अभय नातू (चर्चा) २३:४६, ४ डिसेंबर २०१९ (IST)Reply
@अभय नातू:भारतीय टपाल खाते, रेल्वे खाते इ. हिंदी उच्चारण सहसा वापरतात. मराठी साहित्यातील अधिक विश्वसनीय संदर्भ शोधण्याचा प्रयत्न करेन.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १९:१४, ५ डिसेंबर २०१९ (IST)Reply
@अभय नातू आणि सुबोध कुलकर्णी: व्यक्तीचे जे मूळ (आड)नाव आहे तेच लेखाचे नाव असावे. हिंदी व मराठी या भाषेत काही समान शब्दाचे लेखन एकसारखे असले तरी उच्चारात फरक आढळतो, मात्र वर्ण (अक्षर) बदलत नाही. बरीच मराठी नावे हिंदीत चूकीच्या पद्धतीने लिहण्याचा प्रघात आहे, त्याला योग्य ठरवणे योग्य नाही. उदा. – टिळक चे तिलक (ट चे त), आंबेडकर चे अंबेडकर (आ चे अ). थोडक्यात, देवनागरी लिपी असलेल्या एका भाषेतील वर्ण (अक्षर) दुसऱ्या देवनागरी लिपी असलेल्या दुसऱ्या भाषेत लिहिल्यास वर्ण (अक्षर) बदल होणार नाही. मराठी भाषेत स्वतंत्र 'द' वर्ण असल्यामुळे 'किदवई' ला 'किडवई' लिहिणे योग्य नाही [फार फार तर उच्चारात फरक येऊ शकतो]. --संदेश हिवाळेचर्चा ००:०४, ६ डिसेंबर २०१९ (IST)Reply
"रफी अहमद किडवई" पानाकडे परत चला.