चर्चा:गझल
This article seems to have been written by Suresh Bhat.
Can the original contributor please address copyright issues and also delineate which parts are Mr. Bhat's and which ones are his/her own?
अभय नातू 18:57, 23 ऑगस्ट 2006 (UTC)
श्रीकृष्ण राऊत
संपादनहे सर्व लिखाण श्रीकृष्ण राऊत यांच्या संकेतस्थळावर तसेच्या तसे आढळून येते. कुणी नक्की लेखन केले आहे याचा काही खुलासा मात्र दिसत नाही. कारण त्या स्थळावर मजकुराखाली दिनांक नाही. लेखन सुरेश भट यांचे नाही पण त्यांची अवतरणे आहेत. आणि तसा उल्लेखही आला आहे असे दिसते. 131.170.90.3 ०७:१२, १० ऑक्टोबर २०१३ (IST)
गजल लेख
संपादनगजल या लेखातील मजकूर येथे समाविष्ट करावा.
अभय नातू (चर्चा) ०८:१९, १२ एप्रिल २०१७ (IST)
गजल हा एक वृत्ताचा, काव्याचा आणि गायनाचा प्रकार आहे. गजल हा प्रकार प्राचीन असून, अरबी काव्यात ह्या प्रकाराचा जन्म इस्लाम धर्माच्या स्थापनेअगोदरचा आहे.[१]
गजलेमधे साधारणपणे पाच ते पंधरा कडवी असतात. प्रत्येक कडवे हे दोन ओळींचा शेर असते. शेरामधील ओळींना मिसरह असे म्हणतात.
गजलेतला प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असते.[२]
मराठी गजल
संपादनअमृतराय हे मराठीतले पहिले गजलकवी होत. ‘जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे’ ही त्यांची गजल इ.स. १७२९च्या सुमारास लिहिली गेली. हीच मराठीतली पहिली गजल समजली जाते. त्यानंतर कविवर्य मोरोपंत यांनीही गजला लिहिल्याचे ज्ञात आहे.
त्यानंतरच्या काळात माधव ज्युलियन यांनी अनेक गजला लिहिल्या. इ.स. १९२५ ते १९३४ या काळात त्यांनी मराठीतली पहिली गजल चळवळ चालवली. दुसरी गजल चळवळ इ.स. १९७५ ते १९९५ या दोन दशकांत फोफावली. या चळवळीचे प्रवर्तक सुरेश भट होते. या दोन्ही चळवळींचे कार्य व्यक्तिगत होते. मात्र त्यानंतर भटांच्याच प्रेरणेने तिसरी मराठी गजल चळवळ इ.स.१९९७ पासून सुरू झाली. हिचे प्रवर्तक डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी होत. त्यांच्यामुळे मराठी गजल फोफावली आणि अशा काळात भीमराव पांचाळे पुढे आले, आणि भटांच्याच मार्गदर्शनाखाली मराठी गजलकारांत नवचैतन्य निर्माण केले. भटांचा ‘सप्तरंग’ हा पाचवा गजलसंग्रह प्रकाशित झाला आणि त्यांच्याच तालमीत अनेक गजलकार तयार झाले.
पुणे विद्यापीठात डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ जानेवारी २०१७च्या आसपास ‘मराठी गजलेचा जागतिक संचार’ या विषयावर चर्चासत्र झाले.
मराठी गजलेचा परिचय करून देणारे पुस्तक
संपादन'मराठी गजल - प्रवाह आणि प्रवृत्ती' हे डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी मराठी गजलविषयी लिहिलेल्या लेखांचे संकलन आहे. मराठी गजलेविषयी प्रसिद्ध झालेल्या विविध समीक्षालेखांचा समावेश त्यांनी या पुस्तकात केला आहे. मराठी गजलेच्या उगमापासून अगदी नव्या गजलकारांच्या पुस्तकांपर्यंत अनेक गोष्टींची मीमांसा त्यांच्या पुस्तकात येते. माधव ज्युलियन, सुरेश भट यांच्यापासून प्रसाद कुलकर्णी, हृदय चक्रधर आदी नव्या गजलकारांपर्यंतचा मागोवाही या पुस्तकातून येतो. वेगवेगळी उदाहरणे सांगत त्यांनी गजलेचे सौंदर्य उलगडून दाखवले आहे.
मराठी गजलेचा प्रसार करणाऱ्या संस्था
संपादन- गजल सागर प्रतिष्ठान (भीमराव पांचाळे)
- गजलांकित प्रतिष्ठान (जनार्दन केशव म्हात्रे)
- बांधण जनप्रतिष्ठान (आप्पा ठाकूर)
- माझी गजल (प्रदीप निफाडकर)
- यू.आर.एल. फाऊंडेशन (उदयदादा लाड)
- शब्दांकित (प्रशांत वैद्य)
- सुरेश भट गजलमंच (सुरेशकुमार वैराळकर)
मराठी गजलकारांची पुस्तके
संपादन- एल्गार (सुरेश भट)
- काफला (सुरेश भट)
- झंझावात (सुरेश भट)
- रंग माझा वेगळा (सुरेश भट)
- रसवंतीचा मुजरा (सुरेश भट)
- रूपगंधा (सुरेश भट)
- सप्तरंग (सुरेश भट)
- सुरेश भट - निवडक कविता (सुरेश भट)
- हिंडणारा सूर्य (सुरेश भट)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
संपादन- गजल कशी लिहावी या बद्दलचे लेखन मराठी विकिबुक्स बंधू प्रकल्पात गजलेची बाराखडी येथे पहावे / करावे.
- गजल सादरीकरण कसे असावे याबद्दलचे लेखन गजल सादरीकरण : जनार्दन केशव म्हात्रे
- 'मराठी गजल - प्रवाह आणि प्रवृत्ती' (लेखक - डॉ. अविनाश सांगोलेकर)
संदर्भ
संपादन२) एल्गार - सुरेश भट (गजल संग्रह)