ग्रीनविच प्रमाणवेळ (Greenwich Mean Time; संक्षेप : जी.एम.टी.) ही लंडनच्या ग्रीनविच बरोमधील रॉयल ऑब्झर्व्हेटरीमध्ये पाळली जात असलेली एक प्रमाणवेळ आहे. पृथ्वीवरील मुख्य रेखावृत्त (० रेखांश) लंडनच्या ग्रीनविच ह्या उपनगरामधून जात असल्याचे गृहीत धरले आसल्याने ग्रीनविच प्रमाणवेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यूटीसी (युनिव्हर्सल टाईम कोआॅर्डिनेटेड) या जागतिक प्रमाणवेळेसाठी ग्रीनविच येथील स्थानिक वेळ ही आधारभूत धरली जाते. यूटीसी±००:०० ही प्रमाणवेळ ग्रीनविच वेळेशी संलग्न आहे.

युरोपमधील प्रमाणवेळा:
फिका निळा पश्चिम युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०)
निळा पश्चिम युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०)
पश्चिम युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)
गुलाबी मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)
तपकीरी मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)
मध्य युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)
पिवळा कालिनिनग्राद प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)
सोनेरी पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)
पूर्व युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)
फिका हिरवा मिन्स्क प्रमाणवेळ, मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)
फिक्या र्ंगाने दाखवलेले देश उन्हाळी प्रमाणवेळ पाळत नाहीत: अल्जिरिया, बेलारूस, आइसलँड, मोरोक्को, रशिया, ट्युनिसिया, तुर्कस्तान.
ग्रीनविच घड्याळ

युनायटेड किंग्डममध्ये ग्रीनविच वेळ हीच स्थानिक वेळ म्हणून वापरली जाते.


==बाह्य दुवे==