गोधरा
(गोध्रा या पानावरून पुनर्निर्देशित)
गोधरा हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक शहर व पंचमहाल जिल्ह्याचे मुख्यालय आहे. गोधरा गुजरातच्या पूर्व भागात बडोद्याच्या ८० किमी ईशान्येस तर अहमदाबादच्या १२० किमी पूर्वेस वसले आहे. २०११ साली गोधराची लोकसंख्या १.६१ लाख होती.
गोधरा ગોધરા |
|
भारतामधील शहर | |
देश | ![]() |
राज्य | गुजरात |
जिल्हा | पंचमहाल जिल्हा |
समुद्रसपाटीपासुन उंची | २४० फूट (७३ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | १,६१,९२५ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
२७ फेब्रुवारी २००२ रोजी गोधरा रेल्वे स्थानकाहून निघालेल्या साबरमती एक्सप्रेसला एका मोठ्या मुस्लिम धर्मीय समुदायाने आग लावली. ह्या गाडीमध्ये अयोध्येहून मोठ्या संख्येने परतणारे हिंदू कारसेवक प्रवास करत होते. गाडीच्या एस-६ ह्या डब्यामध्ये २०० लिटर ज्वालाग्रही पदार्थ ओतून लगेचच हा डबा पेटवला गेल्याचे संशोधनामध्ये सिद्ध झाले. ह्या पूर्वनियोजित हिंसाचारात ५९ हिंदू प्रवासी मृत्यू पावले. हा हिंसाचार गुजरातमधील दंगलीला कारणीभूत असल्याचे मानले जाते.