गी द मोपासाँ (फ्रेंच: Henri René Albert Guy de Maupassant) (ऑगस्ट ५, इ.स. १८५० - जुलै ६, इ.स. १८९३) हे फ्रेंच साहित्यिक होते. यांना आधुनिक लघुकथेचे जनक मानले जाते.

गी द मोपासाँ
Guy de Maupassant fotograferad av Félix Nadar 1888.jpg
गी द मोपासाँ
जन्म ऑगस्ट ५, इ.स. १८५०
मृत्यू जुलै ६, इ.स. १८९३
राष्ट्रीयत्व फ्रेंच
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा फ्रेंच
स्वाक्षरी गी द मोपासाँ ह्यांची स्वाक्षरी

जीवनसंपादन करा

गी द मोपासाँ यांचा जन्म ऑगस्ट ५, इ.स. १८५० रोजी शातो द मिरोमेस्निल, नॉर्मंडी येथे झाला. लॉर ल प्वातेव्हाँ आणि गुस्ताव द मोपासाँ या दांपत्याचे ते थोरले अपत्य होत. ते अकरा वर्षांचे असताना त्यांच्या आईने नवर्‍यापासून कायदेशीर फारकत घेतली.

घटस्फोटानंतर, ल प्वातेव्हाँ यांनी थोरला गी आणि धाकटा एर्वे यांचा ताबा स्वतःकडे ठेवला. वडील नसल्याने मोपासाँच्या आयुष्यावर त्याच्या आईचा सगळ्यांत जास्त प्रभाव होता. गीची आई उत्तम वाचक होती. तिला अभिजात साहित्याची आवड होती. वयाच्या तेराव्या वर्षांपर्यंतचा काळ गीने आईसोबत व्हिला दे वेर्गिये येथे आनंदात व्यतीत केला. तेराव्या वर्षी त्याला रूआँ येथील एका प्रतिष्ठित विद्यालयात अभिजात साहित्याच्या अभ्यासक्रमासाठी पाठविण्यात आले.

इ.स. १८६८ साली, गीने प्रख्यात कवी अल्जेर्नों चार्ल स्विनबर्न यांना एत्रेता, नॉर्मंडी येथील किनाऱ्यावर बुडताना वाचवले. ज्युनियर हायस्कुलात गेल्यानंतर गीची भेट प्रख्यात लेखक गुस्ताव फ्लोबेर यांच्याशी झाली.

इ.स. १८७८ साली, गीने सूचना प्रसारण मंत्रालयात काम सुरू केले व ल फिगारो, गिल ब्ला, ल गोल्वा, ल'एको द पारी अशा नामवंत वृत्तपत्रांत सहसंपादक म्हणून काम पाहिले. फावल्या वेळात तो कादंबर्‍या व लघुकथा लिहीत असे.

इ.स. १८८० साली, गीने त्याची पहिली प्रख्यात साहित्यकृती बूल द स्विफ प्रकाशित केली. या साहित्यकृतीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. फ्लोबेराने तिला 'चिरकाल टिकून राहणारी साहित्यकृती' म्हणून गौरवले. गीची ही पहिली लघुकथा फ्रान्स-प्रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर बेतली होती. यानंतर त्याच्या दु आमी, मदर सॅवेज, मादमोझेल फिफि, इत्यादी लघुकथा प्रकाशित झाल्या. इ.स. १८८० ते इ.स. १८९१ या दशकात मोपासाँने विपुल लिखाण केले.

इ.स. १८८१ साली, गीचा पहिला लघुकथासंग्रह 'ला मेसाँ टेलिये' या नावाने प्रकाशित झाला. दोन वर्षांतच या संग्रहाच्या बारा आवृत्त्या प्रकाशित झाल्या. इ.स. १८८३ साली, त्याने पहिली कादंबरी 'यून वी' ('अ वूमन्स लाईफ' या नावाने इंग्लिशीत अनुवादित) हातावेगळी केली. या कादंबरीच्या वर्षाच्या आतच पंचवीस हजार प्रती खपल्या. त्याची दुसरी कादंबरी, बेलामी, इ.स. १८८५ साली प्रकाशित झाली व अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली.

साहित्यसूचीसंपादन करा

कादंबर्‍यासंपादन करा

 • यून वी (१८८३)
 • बेलामी (१८८५)
 • माँतोरिओल (१८८७)
 • पिए‍र ए ज्यां (१८८८)
 • फो‍र्त कोम ला मोर्त (१८८९)
 • नोत्र केर (१८९०)

लघुकथासंग्रहसंपादन करा

 • ले स्वारी द मेदाँ (यात गीची 'बूल द स्विफ' ही लघुकथा आहे. तसेच, झोला, ओस्मान्स इत्यादी लेखकांच्या लघुकथा यात आहेत.) (१८८०)
 • ला मेसाँ टेलिये (१८८१)
 • मादमोझेल फिफि (१८८२)
 • काँते द ला बेकास (१८८३)
 • मिस हॅरियेत (१८८४)
 • ले सर रोंदोली (१८८४)
 • क्लेर द ल्यून (१८८४) (यात गीची 'ले बिजू' ही लघुकथा आहे.)
 • इवेत (१८८४)
 • त्वाइन (१८८५)
 • काँत दु जूर ए द ला न्वित (१८८५)
 • माँसिये पाराँ (१८८६)
 • ला पेतित रोक (१८८६)
 • ल'ओर्ला (१८८७)
 • ल रोझिये द मादाम उसों (१८८८)
 • ला माँ गोश (१८८९)
 • ल'इन्युतिल ब्यूटे (१८९०)

प्रवासवर्णनेसंपादन करा

 • ओ सोलेय (१८८४)
 • सूर लू (१८८८)
 • ला वी एरान्त (१८९०)

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.