खुशवंत सिंग
भारतीय राजकारणी
खुशवंत सिग (लेखनभेद: खुशवंत सिंग) (२ फेब्रुवारी, इ.स. १९१५; हदाली, ब्रिटिश भारत - २० मार्च, इ.स. २०१४; नवी दिल्ली, भारत) हे इंग्लिश भाषेत लेखन करणारे भारतीय लेखक, पत्रकार होते.
खुशवंत सिंह | |
---|---|
जन्म |
खुशवंत सिंह २ फेब्रुवारी, इ.स. १९१५ हदाली, ब्रिटिश भारत सध्या पाकिस्तान |
मृत्यू |
२० मार्च, इ.स. २०१४ नवी दिल्ली |
मृत्यूचे कारण | वृद्धापकाळाने |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | लेखक, पत्रकारिता, इतिहासकार |
कारकिर्दीचा काळ | इ.स. १९३८ पासून इ.स. २०१४ |
मालक | हिंदुस्थान टाइम्स |
प्रसिद्ध कामे | 'खुशवंतनामा- द लेसन्स ऑफ माय लाइफ' |
जोडीदार | कॅंवल मलिक (माहेरचे नाव) |
अपत्ये | पुत्र राहुल सिंग, मुलगी माला |
वडील | वास्तुरचनाकार सर शोभा सिंग |
पुरस्कार | पद्मभूषण(१९७४), पद्मविभूषण (२००७) |
स्वाक्षरी |
शिक्षण व वकिली
संपादनखुशवंत सिंग यांचे शालेय शिक्षण दिल्लीतील मॉडर्न हायस्कूल येथे, महाविद्यालयीन शिक्षण लाहोर आणि दिल्लीत तर उच्चशिक्षण [[केंब्रिज|केंब्रिजमधील। किंग्ज कॉलेज येथे झाले. त्यानंतर लाहोर उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली.
विवाह
संपादनखुशवंत सिंग यांचा इ.स. १९३९ साली कॅंवल मलिक यांच्याशी विवाह झाला. पुत्र राहुल आणि मुलगी माला अशी त्यांची अपत्ये होत.
नोकरी
संपादनइ.स. १९४८ ते इ.स. १९५० या कालावधीत भारत सरकारचे प्रसिद्धी अधिकारी म्हणून खुशवंत सिंग यांनी कॅनडामधील टोरोंटो येथे, ब्रिटनमधील उच्चायुक्तालयात आणि आर्यलडमधील दूतावासात काम केले.
इ.स. १९८० ते इ.स. १९८६ या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते.
पत्रकारिता
संपादन- परदेशातून दिल्लीत आल्यावर खुशवंत सिंग यांनी नियोजन आयोगाच्या 'योजना' या मासिकाची स्थापना केली. त्या मासिकाचे संपादक तेच होते.
- नॅशनल हेराल्ड व हिंदुस्तान टाइम्सचे संपादक
- इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडियाचे संपादक (इ.स. १९६९ पासून). या साप्ताहिकाचा खप त्यांनी ६५ हजारांवरून चार लाखांवर नेला. नऊ वर्षे या साप्ताहिकात काम केल्यावर २५ जुलै, इ.स. १९७८ रोजी त्यांना तडकाफडकी निवृत्त केले गेले.
खुशवंत सिग यांनी लिहिलेली इंग्रजी पुस्तके
संपादन- अॅग्नॉस्टिक खुशवंत सिंग : देअर इज़नो गॉड (इ.स. २०१२)
- अन्सर्टन लिएझॉंन्स, सेक्स, स्ट्राईफ़ अँड टुगेदरनेस इन अर्बन इंडिया (इ.स. १९९५)
- आय शॅल नॉट हिअर द नाइटिंगेल (इ.स. १९५९)
- दि इलस्ट्रेटेड हिस्टरी ऑफ दि सिख्ज़ (इ.स. २००६)
- दि एन्ड ऑफ इंडिया (इ.स. २००३)
- दि कंपनी ऑफ वीमेन (इ.स. १९९९)
- गदर १९१५ : इंडिया’ज़ फर्स्ट आर्म्ड रिव्हॉल्युशन (इ.स. १९६६)
- ट्रॅजेडी ऑफ पंजाब (इ.स. १९८४)
- ट्रुथ, लव्ह अँड अ लिटिल मॅलिस (आत्मचरित्र, इ.स. २००२)
- ट्रेन टू पाकिस्तान (कादंबरी, इ.स. १९५६). त्याच नावाचा मराठी अनुवाद - अनिल किणीकर)
- डिक्लेअरिंग लव्ह इन फोर लॅन्ग्वेजेस (सहलेखिका - शारदा कौशिक, इ.स. १९९७)
- डेथ अॅट माय डोअरस्टेप (इ.स. २००५)
- दिल्ली : अ नॉव्हेल (इ.स. १९९०)
- नॉट अ नाईस मॅन टुनो : (खुशवंतसिंगांच्या उत्कृष्ट लेखांचा संग्रह, इ.स. १९९३)
- पॅरॅडाइज़ अँड अदर स्टोरीज़ (इ.स. २००४)
- दि फॉल ऑफ दि किंग्डम ऑफ पंजाब (इ.स. १९६२)
- बरियल अॅट द सी (इ.स. २००४)
- ए ब्राईड फॉर दि साहिब अँड अदर स्टोरीज़ (इ.स. १९६७)
- ब्लॅक जस्मिन (इ.स. १९७१)
- दि मार्क ऑफ विष्णू अँड अदर स्टोरीज़ (इ.स. १९५०)
- रणजितसंग : दि महाराजा ऑफ पंजाब (इ.स. १९६३)
- विथ मॅलिस टोवर्ड्ज़ वन अँड ऑल (?)
- वी इंडियन्स (इ.स. १९९३)
- वीमेन अँड मेन इन माय लाईफ़ (इ.स. १९९५)
- दि व्हॉईस ऑफ गॉड अँड अदर स्टोरीज़ (इ.स. १९५७)
- व्हाय आय सपोर्टेड दि इमर्जन्सी एसेज़ अँड प्रोफाइल्स (इ.स. २००९)
- शीख (इ.स. १४६९ ते१८३८) या काळातील इतिहासाचे दोन खंड (इ.स. १९५३, इ.स. १९६३ आणि इ.स. २००४)
- द सनसेट क्लब (इ.स. २०१०)
- द सिख्ज़ टुडे (इ.स. १९५९)
- सेक्स, स्कॉच अँड स्कॉलरशिप (निवडक लेखांचा संग्रह, इ.स. १९९२)
खुशवंत सिंग यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
संपादन- इ.स. १९६६ : रॉकफेलर शिष्यवृत्ती
- इ.स. १९७४ : पद्मभूषण (सरकारने सुवर्ण मंदिरावर लष्कर घुसविल्याच्या निषेधार्थ हा पुरस्कार त्यांनी १९८४ साली परत केला.)
- इ.स. २००० : सुलभ इंटरनॅशनलचा ऑनेस्ट मॅन ऑफ द इअर पुरस्कार
- इ.स. २००६ : पंजाब रत्न ्पुरस्कार
- इ.स. २००७ : पद्मविभूषण
- इ.स. २०१० : साहित्य अकादमी फेलोशिप अॅवार्ड
- इ.स. २०१२ : ऑल इंडिया मायनॉरिटीज फोरम अॅन्युअल फेलोशिप अॅवार्ड
- इ.स. २०१३ : मुंबईच्या टाटा लिटरेचर लाइव्ह कडून जीवनगौरव पुरस्कार
- अनेक विद्यापीठांच्या मानद डॉक्टरेट पदव्या
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |