कॉलोराडो
'कोलोराडो (किंवा कॉलोराडो, Colorado) अमेरिकेचे एक राज्य आहे. कोलोराडो हे नाव स्पॅनिश भाषोत्पन्न आहे. या भाषेतकोलोराडोचा अर्थ लाल नदी असा होतो.
कोलोराडो | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
रहिवासी | कोलोराडन | ||||||||||
राजधानी | डेन्व्हर | ||||||||||
मोठे शहर | डेन्व्हर | ||||||||||
सर्वात मोठे महानगर | डेन्व्हर | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत ८वावा क्रमांक | ||||||||||
- एकूण | २,६९,८३७[१] किमी² (१,०४,१८५[१] मैल²) | ||||||||||
- % पाणी | ०.३६ | ||||||||||
- अक्षांश | ३७o उत्तर ते ४१o उत्तर | ||||||||||
- रेखांश | १०२°०३' पश्चिम to १०९°०३' पश्चिम | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत २२वावा क्रमांक | ||||||||||
- एकूण | ४३,०१,२६१ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | १६.०१/किमी² (अमेरिकेत ३७वावा क्रमांक) | ||||||||||
- सरासरी उत्पन्न | $५१,०२२ | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | ऑगस्ट १, १८७६ (३८वावा क्रमांक) | ||||||||||
गव्हर्नर | जॅरेड पोलिस(डे.) | ||||||||||
संक्षेप | CO US-CO | ||||||||||
संकेतस्थळ | www.colorado.gov |
कोलोराडो साधारणपणे अमेरिकेच्या मध्य-पश्चिम भागात आहे. कोलोराडोला रॉकी पर्वताचे घर मानतात.
महत्त्वाची शहरे
संपादन- डेन्व्हर - राजधानी
- कॉलोराडो स्प्रिंग्ज
- पेब्लो
- बोल्डर
- फोर्ट कॉलिन्स
- ॲस्पेन
इतिहास
संपादनकोलोराडो हे जुलै ४, इ.स. १८७६ रोजी अधिकृतपणे संयुक्त संस्थानात समाविष्ट झाले. याच दिवशी अमेरिकेच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण झाली असल्यामुळे कोलोराडोला शतकी राज्य (सेन्टेनियल स्टेट) असे म्हणले जाते.
भूगोल
संपादनकोलोराडो राज्याचे दोन मुख्य भौगोलिक प्रदेश आहेत. राज्याच्या पूर्व भागात सपाट प्रेअरी मैदाने आहेत तर पश्चिम भाग हा अर्ध पर्वतीय प्रदेश आहे.
पूर्व
संपादनपश्चिम
संपादनरॉकी माऊंटन पर्वतरांगांतील मुख्य रांग राज्याच्या मध्यातून उत्तरदक्षिण गेलेली आहे, तर इतर पर्वतरांगा पश्चिमेस आहेत. अमेरिकेतील १०,०००फुटापेक्षा जास्त उंची असलेल्या जमिनीपैकी अर्ध्याहून अधिक जमीन कोलोराडोत आहे.[२] हीत १४,००० फुटांपेक्षा जास्त उंचीच्या ५३ शिखरांचा समावेश होतो.
नद्या
संपादनकोलोराडोमध्ये चार मोठ्या नद्या उगम पावतात.
- [कोलोराडो नदी]] - रॉकी माउंटन नॅशनल पार्कमध्ये उगम पावून राज्याचा पश्चिम भागातून वाहत पुढे ग्रॅंड कॅन्यन मधून जाऊन बाहा कॅलिफोर्नियाद्वारे प्रशांत महासागरास मिळते.
- आर्कान्सा नदी - राज्याच्या मध्यात उगम पावून पूर्वेस वाहते. मिसिसिपी नदीस मिळते.
- रियो ग्रांदे नदी - सान लुइस खोऱ्यात उगम असलेली ही नदी दक्षिणेस वाहते व टेक्सास आणि मेक्सिकोच्या सीमेवरून वाहत मेक्सिकोच्या अखातास मिळते.
- साऊथ प्लॅट नदी - डेन्व्हरच्या पश्चिमेस उगम पावून ईशान्येस वाहते व मिसूरी नदीस मिळते.
प्रशासन व राजकारण
संपादनकोलोराडोचे प्रशासन अमेरिकेतील इतर राज्यांप्रमाणे आहे. कोलोराडोचे गव्हर्नकोलोराडोचा गव्हर्नर]] राज्याचा मुख्याधिकारी असतो. याची निवडणूक थेट मतदानाने होते. कोलोराडोचे प्रतिनिधीगृह व सेनेट ही दोन सभागृहे राज्यातील कायदे करण्याचे तसेच अंदाजपत्रक पारित करण्याचे काम करतात.
कोलोराडो राज्य ६४ काऊंट्यांमध्ये विभागलेले आहे. प्रत्येक काऊंटीचे स्वतंत्र प्रशासन असते. डेन्व्हर, ब्रूमफील्ड आणि बोल्डर या काऊंट्यांचे प्रशासन त्या त्या शहराच्या प्रशासनाद्वारे चालते.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ a b "२००० जनगणना". जुलै १८,२००७ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "संग्रहित प्रत". 2011-12-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-07-04 रोजी पाहिले.