कॉलोराडो नदी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यात उगम पावणारी एक प्रमुख नदी आहे. रॉकी पर्वतरांगेतपासून वाहणारी ही नदी युटा, नेव्हाडा, अ‍ॅरिझोनाकॅलिफोर्नियातून वाहत कॉर्तेझच्या समुद्रास मिळते. ग्रॅंड कॅन्यन ही या नदीने लक्षावधी वर्षांत कोरून काढलेली अतिप्रचंड घळ आहे. या घळीचा समावेश जगातील सात नैसर्गिक आश्चर्यांमध्ये करण्यात आलेला आहे.

कॉलोराडो
इतर नावे रियो कॉलोराडो
उगम ला पूडर पास सरोवर
मुख कॅलिफोर्नियाचा अखात
पाणलोट क्षेत्रामधील देश कॉलोराडो, युटा, अ‍ॅरिझोना, नेव्हाडा, कॅलिफोर्निया (अमेरिका)
लांबी २,३३० किमी (१,४५० मैल)
उगम स्थान उंची २,७०० मी (८,९०० फूट)
सरासरी प्रवाह ६२० घन मी/से (२२,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ६,२९,१००
उपनद्या ग्रीन नदी, लिटल कॉलोराडो नदी, गिला नदी
धरणे हूवर धरण, ग्लेन कॅन्यन धरण

या नदीवर हूवर डॅम हा बांध आहे.