केशव बळीराम हेडगेवार

(के. बी. हेडगेवार या पानावरून पुनर्निर्देशित)


केशव बळीराम हेडगेवार (एप्रिल १, १८८९ - जून २१, १९४०) हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे संस्थापक होते.

केशव बळीराम हेडगेवार

टोपणनाव: डॉं. हेडगेवार
जन्म: एप्रिल १, १८८९
नागपूर, महाराष्ट्र, हिंदुस्थान

ब्रिटिश भारत

मृत्यू: जून २१, १९४०
नागपूर, महाराष्ट्र, हिंदुस्थान

ब्रिटिश भारत

चळवळ: हिंदू धर्म पुनरुज्जीवनवाद व सुधारणा
संघटना: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
प्रमुख स्मारके: डॉ.हेडगेवार स्मारक समिती,नागपूर
धर्म: हिंदू
प्रभाव: बाळकृष्ण शिवराम मुंजे ,लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद ,छत्रपती शिवाजी महाराज
प्रभावित: माधव गोळवलकर ,बाळासाहेब देवरस ,अटलबिहारी वाजपेयी नरेंद्र मोदी
वडील: बळीराम हेडगेवार

डॉं. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेला एप्रिल १ सन इ.स. १८८९ मध्ये महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील बोधन तालुक्यातील कुंदकुर्ती गावात झाला.

चरित्र

संपादन

हेडगेवारांचे शिक्षण त्यांच्या मोठ्या भावाने केले. मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर, इ.स. १९१० साली ते वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी ते कलकत्त्याला गेले. तरुणपणात त्यांनी सशस्त्र क्रांतीत सहभाग घेतला होता. शाळेत असताना त्यांनी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाटण्यात आलेली मिठाई रागाने फेकून दिली होती. तसेच पुढे ‘वंदे मातरम्‌’चा घोष केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. बंगालमधील प्रत्यक्ष क्रांतिकार्यात सहभाग घेता यावा यासाठी त्यांनी आपले उच्चशिक्षण जाणीवपूर्वक कोलकतामध्ये घेतले. तेथे ते अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते बनले. पुढील काळात नागपुरात परतल्यावर काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला व अनेक वेळा कारावास भोगला. इ.स. १९२० ते इ.स. १९३१ या काळात ते अनेक सत्याग्रहांमध्ये, आंदोलनांमध्ये सहभागी होते.

डॉक्टरांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक वेगळे तत्त्वज्ञान व वेगळ्या प्रकारची कार्यपद्धती दिली. त्या पायावरच रा. स्व. संघ हा गेली अनेक वर्षे यशस्वीरीत्या कार्यरत आहे. क्रांतिकार्यातील आपले जुने सहकारी सोबत घेऊन त्यांनी नागपुरात एका पडक्या वाड्यात संघाची पहिली शाखा सुरू केली. चारित्र्यसंपन्न व्यक्तिनिर्माण व त्या आधारावर राष्ट्रनिर्माण या अंतिम ध्येयाचा विचार त्यांनी संघस्थापनेच्या माध्यमातून केला. डॉ. हेडगेवार हे कुशल संघटक, मार्गदर्शक व नेते होते. त्यांच्याच प्रेरणादायी नेतृत्वामुळे गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, भैय्याजी दाणी, एकनाथजी रानडे (स्वामी विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार), पं. दीनदयाळ उपाध्याय आदी नेते - कार्यकर्ते भारताला प्राप्त झाले. इ.स. १९२५ ते इ.स. १९४० या काळात, सतत १५ वर्षे डॉक्टर देशभर प्रवास करत होते, एक-एक माणूस, कार्यकर्ता, स्वयंसेवक घडवण्याचा व संघाला जोडण्याचा प्रयत्न करत होते.

सच्चे नेतृत्व, त्याग, सेवा, समर्पण भावना, दूरदर्शी विचार आणि शिस्तबद्ध, निश्चल व व्रतस्थ कार्यजीवनशैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विविध अंगे होती. दिनांक २१ जून,इ.स. १९४० साली डॉक्टरांचे निधन झाले. त्यापूर्वी एक वर्ष आधी त्यांनी संघाच्या कार्यपद्धतीबाबत संघस्वयंसेवकांसाठी काही निर्देश देऊन ठेवले. संघाची निश्चित अशी कार्यपद्धती तयार झाली. आपल्या पश्चात संघटनेला ध्येयप्राप्तीसाठी आवश्यक असलेली शिदोरीच जणू त्यांनी संघाला अर्पण केली.

भगवा ध्वज, गुरू, गुरुदक्षिणेची वेगळी संकल्पना, विचारांना मुख्य व व्यक्तीला गौण स्थान, सामूहिक निर्णय पद्धती, पूर्णवेळ कार्यकर्ता संकल्पना, दैंनदिन शाखा (बाल-तरुण-थोरांनी रोज संध्याकाळी खेळण्यासाठी, देशभक्तिपर गाणी म्हणण्यासाठी एकत्र जमणे), सभासद नोंदणी-अध्यक्ष-सचिव-संचालक मंडळ या प्रचलित पद्धतींना फाटा आदी वैशिष्ट्ये असलेली कार्यपद्धती डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये रुजवली.

हेडगेवारांवरील मराठी पुस्तके

संपादन
  • गोष्टीरूप हेडगेवार (बालसाहित्य, लेखक - शंकर कऱ्हाडे)
  • मला उमगलेले डॉक्टर हेडगेवार (रमेश पतंगे)
  • युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार ('सांस्कृतिक वार्तापत्र' या पाक्षिकाचा ३१ मार्च २०१४चा अंक)

डॉ. हेडगेवार - लेखक श्री. ना. ह.पालकर.

बाह्य दुवे

संपादन
मागील
'
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक
१९२५ - १९४०
पुढील
माधव सदाशिव गोळवलकर