बाळकृष्ण शिवराम मुंजे
संघ-प्रवर्तक नेता, हिंदु-महासभेचे सदस्य
बाळकृष्ण शिवराम मुंजे (डिसेंबर १२, इ.स. १८७२ - मार्च ४, इ.स. १९४८) भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक पुढारी व काँग्रेसमधील लोकमान्य टिळकांच्या जहाल विचारसरणीचे समर्थक होते. पेशाने डॉक्टर असलेल्या मुंज्यांनी उत्तरायुष्यात हिंदू पुनरुत्थानाकरता हिंदू महासभेच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्यांनी नाशकातील 'भोंसला मिलिटरी स्कूल' ही सैनिकी शाळेच्या स्थापण्याकरता पुढाकार घेतला; तसेच देहरादून येथील 'इंडियन मिलिटरी अकॅडमी' या सैनिकी प्रशिक्षणसंस्थेच्या स्थापनेतही पुढाकार घेतला.
बाळकृष्ण शिवराम मुंजे | |
---|---|
जन्म: | डिसेंबर १२, इ.स. १८७२ बिलासपूर, छत्तीसगड, भारत |
मृत्यू: | मार्च ४, इ.स. १९४८ नाशिक, महाराष्ट्र, भारत |
चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा हिंदू पुनरुत्थान |
धर्म: | हिंदू |
प्रभाव: | बाळ गंगाधर टिळक |
प्रभावित: | केशव बळीराम हेडगेवार |