जनक

(कुशध्वज जनक या पानावरून पुनर्निर्देशित)

जनक हे निमि राजाच्या वंशात जन्मलेला विदेह देशाचे राजा होते. विदेहावर राज्य केलेल्या निमीच्या वंशजांच्या संदर्भात जनक हे कुलनाम वापरले जाते. मिथिला, म्हणजे सध्याच्या नेपाळातील जनकपूर, येथून जनकांनी राज्य चालवले. जनक कुळापैकी सीरध्वज जनक याचा उल्लेख रामायणात सीतेचा पिता व रामाचा सासरा म्हणून आला आहे. कुशध्वज जनक हा भरत-शत्रुघ्न यांचा सासरा.

इक्ष्वाकूचा पुत्र निमि हा सूर्यवंशी राजा जनक कुळाचे आद्य पुरुष होते. या वंशातील मिथि जनक याने मिथिला ही विदेहाची राजधानी वसवली. मिथि जनकावरून या कुळास जनक हे नाव मिळाले.

हे सुद्धा पहा

संपादन