सीरध्वज जनक (संस्कृत: सीरध्वज जनक ; ख्मेर: जनक ; तमिळ: ஜனகன், चनकन् ; थाई: चोनोक ; भासा मलायू: Maharisi Kala, महरिसी काला;) हा रामायणात उल्लेखलेला विदेह देशाचा जनक कुळातील राजा होता. तो सीतेचा पिता व रामाचा सासरा होता [].

राम-सीता यांच्या लग्नासाठी आलेल्या दशरथ, राम, लक्ष्मण यांच्यासह आलेल्या वऱ्हाडी मंडळींचे स्वागत करणारा सीरध्वज व त्याचा जनक परिवार. (चित्रनिर्मिती: इ.स. १७०० - इ.स. १७१०)

जनक कुळातील ऱ्हस्वरोमन् राजाच्या दोन पुत्रांपैकी सीरध्वज थोरला पुत्र होता. सीरध्वजाला कुशध्वज नावाचा धाकटा भाऊ होता. सीरध्वज निपुत्रिक असल्यामुळे त्याच्यामागून कुशध्वज विदेहाचा राजा बनला[].

परिवार

संपादन

सीरध्वजास सीताउर्मिला नावाच्या दोन कन्या होत्या. त्या दोघींचा विवाह अनुक्रमे रामलक्ष्मण यांच्याशी झाला.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ a b चित्राव, सिद्धेश्वरशास्त्री, ed. (१९६८). "कुशध्वज". भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश. भारतीय चरित्रकोश मंडळ, पुणे. p. २५२.