कामशेत
कामशेत हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे.
?कामशेत महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
![]()
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मावळ |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थानसंपादन करा
कामशेत हे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत नावाचा छोटासा घाट आहे. त्या घाटाच्या पायथ्याशी हे गाव आहे. हे गाव पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात येते. रियासतकार सरदेसाई यांचा मृत्यू कामशेत येथे झाला..
कामशेत हे पुणे-लोणावळा मार्गावरील एक रेल्वे स्थानक असून इंद्रायणी नदी या स्थानकाला लागून आहे.
कामशेतला भात सडण्याच्या खूप गिरण्या आहेत. त्यामुळे येथे आंबेमोहर, इंद्रायणी या स्थानिक जातींचे तांदूळ किमान किमतीत मिळतात.
कामशेतमधील शाळासंपादन करा
- पंडित नेहरू विद्यालय
- महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची आश्रमशाळा
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
कामशेतमधील मशिदीसंपादन करा
- अमिना मशीद
- जामा मशीद
हवामानसंपादन करा
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा,जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी.पर्यंत असते.