कात्रज घाट पुणे शहराच्या दक्षिणेच्या डोंगररांगेतून आहे. मुंबई-पुणे-सातारा महामार्ग (NH 4) याच घाटातून जातो.कात्रज घाट हे नाव या घाटास पायथ्याशी वसलेल्या आणि सद्ध्या पुण्याचे एक उपनगर मानण्यात येणाऱ्या कात्रज गावामुळे मिळाले आहे. सद्ध्या कात्रज घाट पार करण्यासाठी दोन मार्ग उपलब्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे घाटातुन जाणारा जुना मार्ग. हा मार्ग सुमारे सहा कि मीचा आहे. सद्ध्या या जुन्या रस्त्याच्या पश्चिमेकडून दोन नव्याने बांधण्यात आलेल्या १.३४ कि मी लांबीच्या बोगद्यामार्गे कात्रज डोंगर पार करता येतो. धन्यवाद

कात्रज बोग्दा

भूगोल

संपादन

पुण्याची दक्षीण सीमा म्हणुन कात्रज डोंगरांचा निर्देश करता येईल. कात्रज घाटाचा डोंगर भौगोलिक द्रुष्ट्या भुलेश्वर डोंगररांगेत येतो. ही डोंगररांग सह्याद्रीला काटकोनात फुटलेल्या फाट्यांपैकी एक आहे.

हवामान

संपादन

कात्रज घाटातील हवामान हे पुण्यातील हवामानासारखेच आहे व सोसाट्याचा वारा देखील असतो.

जैवविविधता

संपादन

वनस्पती

संपादन

कात्रज घाटतील वन हे शुष्क पानझडी प्रकारचे आहे. कात्रज डोंगरावरील वनस्पतींमध्ये खूप विविधता दिसुन येते. कात्रज घाटतील जंगलात गणेर, मोई आणि सालई, पांढरुखया स्थानिक वृक्षांचा समावेश असलेला एक गट आहे. या वृक्षांच्या सोबतच मेडशींगी, हिवर, बारतोंडी, पाचुंदा, पळस, पांगारा, सावर, बहावा, वारस ही झाडेसुद्धा आहेत. पुणे परिसरातील इतर टेकड्यांच्या पेक्षा वेगळे असणारे मोह, कांचन, टेंभुर्णी, बिब्बा, तिवस, वावळा, आपटा, धामण यासारखे वृक्ष कात्रज डोंगरावर आढळून येतात. ओहोळांच्या कडेला वाढरे, उंबर, जांभूळ हे वृक्ष कात्रजला दिसू शकतात. वृक्षांसोबतच कात्रज घाटतील जंगलात छोट्या वर्षायु वनस्पतींचे प्रमाणही लक्षणीय आहे. पावसाळ्यानंतर टेकडीवर अनेक सुंदर पुष्पवंत वनस्पती पाहता येतात. यामध्ये एफिमेरल्स किंवा अशा अल्पजीवी वनस्पतींसुद्धा खूप प्रमाणात आहेत. कोरांटी, दिपकाडी, कुळी, खरपुडी, तेरडा, डिंगळा, रानतीळ, गारवेल, रानतिळ, दिपमाळ,काटेचेंडु, दसमुळी, चिराइत, रान-भेंडी, हळदीकुंकु यासारख्या अनेक वर्षायु वनस्पती आपण कात्रजला पाहु शकतो.

वृक्षांची जंत्री

संपादन

कात्रज घाटतील वृक्षांची जंत्री करण्याचे आणि त्यांच्या अभ्यासाचे मह्त्वाचे काम श्री. वा.द.वर्तक यांनी केले. "फ़्लोरा ओफ़ कात्रज घाट" या त्यांच्या शास्त्रीय अभ्यासलेखात कात्रज घाटातील वनस्पतींची तपशीलवार यादी मिळु शकते. अगदी अलीकडल्या काळात डॉ मंदार दातार आणि डॉं. विनया घाटे यांनी कात्रज घाटतील जंगलात झालेल्या बदलांचा अभ्यास करून एका शास्त्रीय लेखात हे बदल नोंदले आहेत.

प्राणी

संपादन

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन

टेकडी पुणे संकेतस्थळ