नवीन कात्रज बोगदा हा पुणे शहरामधील कात्रज परिसरामधील एक बोगदा आहे. पुणे-बंगळूर महामार्गावरील जुना कात्रज घाट वाहतुकीसाठी अपुरा पडू लागल्यामुळे हा बोगदा बांधण्यात आला. प्रत्येकी ३ मार्गिका असलेले १,३३८ मीटर लांबीचे हे दोन बोगदे राष्ट्रीय महामार्ग ४८चा भाग आहेत.

पुणे-सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगदा

नवीन कात्रज बोगद्याचे उद्घाटन २००६ साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख ह्यांनी केले.

नवीन कात्रज बोगद्याचे नकाशावरील स्थान