कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक

कल्याण जंक्शन हे कल्याण शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात. कल्याण येथे मुंबई उपनगरी रेल्वेचा मध्य मार्ग दोन शाखांमध्ये विभागतो. ईशान्य शाखा कसाऱ्यामार्गे मनमाडकडे तर आग्नेय शाखा कर्जतमार्गे पुण्याकडे धावते. मुंबई उपनगरी सेवेमधील कल्याण तिसरे सर्वात वर्दळीचे स्थानक आहे.

कल्याण

मध्य रेल्वे स्थानक
मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता कल्याण, ठाणे जिल्हा
गुणक 19°14′6″N 73°7′50″E / 19.23500°N 73.13056°E / 19.23500; 73.13056
मार्ग मुंबई-नागपूर-हावडा मार्ग
मुंबई-चेन्नई मार्ग
मध्य मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत KYN
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
कल्याण स्थानकावर थांबलेली अलाहाबाद दुरंतो एक्सप्रेस
कल्याण जंक्शन
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
ठाकुर्ली
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
शहाड, विठ्ठलवाडी
स्थानक क्रमांक: २६ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ५३ कि.मी.