Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कऱ्हा नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. ही नीरा नदीची उपनदी आहे. ही पुणे जिल्ह्यातून वाहते. पुणे जिल्ह्यातील सासवड हे तालुक्याचे ठिकाण या नदीकाठी वसले आहे. तिच्या काठावर जिल्ह्यातील सासवड आणि बारामती ही दोन प्रमुख गावे आहेत.

कऱ्हा नदी
उगम नसरापूर
पाणलोट क्षेत्रामधील देश महाराष्ट्र
ह्या नदीस मिळते नीरा नदी

भौगोलिकसंपादन करा

कऱ्हा नदीचा उगम सासवड तालुक्यातून होतो. कऱ्हा नदी ही पूर्व वाहिनी नदी आहे. कऱ्हा नदीवर जेजुरी जवळील नाझरे येथे मल्हारसागर नावाचे धरण बांधलेले आहे. कऱ्हा नदी पुणे जिल्ह्याच्या सीमेवर नीरा नदीला सोनगाव येथे मिळते आणि संपते.

प्रसिद्ध व्यक्तीसंपादन करा

सासवड हे आचार्य अत्र्यांचे मूळ गाव तर लेखक-नाटककार-कवी-वक्ते असलेल्या अत्र्यांच्या आत्मचरित्राचे नाव कऱ्हेचे पाणी असे आहे. बारामती हे राजकीय नेते असलेल्या शरद पवारांचे गाव आहे.

इतिहाससंपादन करा

कऱ्हा नदीच्या काठी, एक महान मराठी समाजवादी लेखक आणि चित्रपट निर्माते पी. के. अत्रे[१] यांचा जन्म झाला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील ते एक नेते होते. त्यांच्या या चळवळीवरील पुस्तकांची मालिका, कऱ्हेचे पाणी हा मराठीतील साहित्याचा एक प्रसिद्ध भाग आहे.


संत तुकाविप्र आणि कऱ्हा नदी परिक्रमा

शके १६९२ ला संत नामदेव यांनी केलेल्या शतकोटी[२] अभंग रचनेच्या संकल्पांची संत तुकाविप्र यांच्याकडून  पूर्तता झाल्यानंतर, संत तुकाविप्र यांनी शके १६९३ पासून कऱ्हा नदीची प्रदक्षिणा केली. या काळातील राजकीय घटना म्हणजे थोरले माधवराव पेशवे यांचा मृत्यू , नारायण रावांचा खून, धाकटे माधव राव पेशवे यांना पेशवेपद बहाल झाले या परिस्थितीत लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्यांनी कीर्तनांच्या माध्यमातून जनजागृती केली. यामधून  त्यांनी सामाजिक एकतेचा संदेश दिला.

[३]

  1. ^ "Pralhad Keshav Atre". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-12-15.
  2. ^ "शतकोटी".
  3. ^ संत तुकाविप्र रचित तत्वमसि. 2020. pp. संत तुकाविप्र यांच्या काळातील तत्वमसिची गरज.