मोरगाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे. येथे मयुरेश्वराचे मंदिर आहे. हे गाव कऱ्हा नदी किनारी वसलेले आहे.अष्टविनायकाची यात्रा मोरेश्वराच्या दर्शनाने सुरू होते.

मोरावर बसून दैत्यांच्या पराभव केला म्हणून गणेश "मोरेश्वर" किंवा "मयुरेश्वर" या नावाने ओळखले जाऊ लागले. म्हणून गावास मोरगाव म्हणून ओळखले जाते.

भौगोलिक स्थान

संपादन
मोरगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील एक गाव आहे.हे गाव बारामती - पुणे या राज्य महामार्गावर वसलेले आहे. येथे महाराष्ट्रातील सात अष्टविनायकांपैकी एक अष्टविनायक श्री.मयुरेश्वर आहे. हा गणपती अष्टविनायकांपैकी मुख्य मानला जातो व अष्टविनायक यात्रा येथुनच सुरू होते. 

पुणे शहरापासून मोरगाव 67 कि.मी अंतरावर आहे व बारामती पासून 32 कि.मी अंतरावर आहे. जवळच संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे कुलदैवत श्री क्षेत्र जेजुरी हे 17 कि.मी अंतरावर आहे.

हवामान

संपादन

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते.