Disambig-dark.svg

कर म्हणजे शासनाला सेवा पुरवल्याबद्दल देण्याचा एक मोबदला होय. कराच्या मोबदल्यात शासनाकडून त्या प्रमाणात सेवा किंवा वस्तू मिळतीलच, अशी आशा किंवा इच्छा न ठेवता शासनाला कायदेशीरदृष्ट्या दिली जाणारी रक्कम म्हणजेच कर होय[१]. कर हे शासनालाचे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. कर दोन प्रकारचे असतात - अप्रत्यक्ष करप्रत्यक्ष कर. करांचे वेगवेगळे प्रकार आहेत. वैयक्तिक प्राप्तीकर (आयकर), महामंडळकर, भांडवली नफाकर, भांडवलावरील आणि मालमत्तेवरील कर, खर्चावरील कर, वस्तूंवरील कर, उत्पादनावरील कर, आयातीवरील व निर्यातीवरील कर, विक्रीकर असे वेगवेगळे करांचे प्रकार आहेत. करवसुलीसाठी शासनाकडे यंत्रणा असते. करविषयक सल्लागारही असतात. कर भरण्यासाठी विविध योजना असतात. १ जुलै २०१७ पासून 'एक देश एक कर' प्रणाली सुरू करण्यात आली. कोणताही नवीन कर प्रारंभी फक्त काही ठराविक लोकांच्या ठराविक उत्पन्नावर लावला जातो व नंतर हळूहळू त्याची व्याप्ती वाढवून सर्व लोकांचे त्या प्रकारचे सर्व उत्पन्न करपात्र करण्यात येते.


करिदिन  : मकर संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस. या दिवसाला किंक्रांत असेही म्हंणतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. ^ "कर आकारणी , वसुली व संकलन » नगरपालिका". नगरपालिका (इंग्रजी भाषेत). 2021-02-28. 2021-09-03 रोजी पाहिले.