जीना आंतरराष्ट्रीय विमानतळ

(कराची आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

कराची आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा जीना आंतरराष्ट्रीय विमानतळ पाकिस्तानच्या कराची शहरातील विमानतळ आहे. हा पाकिस्तानमधील सगळ्यात मोठा विमानतळ आहे.

जीना आंतरराष्ट्रीय विमानतळ
جناح بین الاقوامی ہوائی اڈہ
आहसंवि: KHIआप्रविको: OPKC
KHI is located in पाकिस्तान
KHI
KHI
पाकिस्तानमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक/प्रचालक पाकिस्तान नागरी विमान वाहतूक कंपनी
कोण्या शहरास सेवा कराची
स्थळ सिंध, पाकिस्तान
हब एरब्लू
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्स
शाहीन एर
समुद्रसपाटीपासून उंची १०० फू / ३० मी
गुणक (भौगोलिक) 24°54′24″N 067°09′39″E / 24.90667°N 67.16083°E / 24.90667; 67.16083
संकेतस्थळ कराचीएरपोर्ट.कॉम.पीके
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
07R/25L 3,400 11,155 कॉंक्रीट
07L/25R 3,200 10,500 कॉंक्रीट

इतिहास

संपादन
 
जीना टर्मिनलवर थांबलेले पीआयएचे विमान

इ.स. १९४०च्या सुमारास या विमानतळाच्या जागी एक धावपट्टी व हॅंगर बांधले गेले. आर-१०१ या विमानाच्या जगप्रवासासाठी बांधल्या गेलेल्या तीन हॅंगरपैकी ते एक होते. हे विमान प्रवासात असताना फ्रान्समध्ये अपघातात नष्ट झाले व कराचीस कधीच आले नाही. १९६० च्या दशकात जनरल अयुब खानने हे हॅंगर पाडून टाकण्याचा हुकूम दिला.

इ.स. १९६०ते १९८० दरम्यान कराची विमानतळ जगातील महत्त्वाच्या विमानतळांपैकी एक होता. तेव्हा तेथे ब्रिटिश एरवेझ, लुफ्तांसा, अलिटालिया, जाट एरवेझ, एरोफ्लोत, फिलिपाइन एरलाइन्स, नायजेरिया एरलाइन्स, इथियोपियन एरलाइन्स, इजिप्त एर, ईस्ट आफ्रिकन एरवेझ, केन्या एरवेझ, येमेनिया, इराण एर, एर फ्रान्स, क्वांटास, केएलएम, पॅन ॲम, स्कॅंडिनेव्हियन एरलाइन्स, कुवैत एरवेझ यांसह अनेक विमानकंपन्यांची उड्डाणे येत जात असत.

१९८० च्या दशकाच्या शेवटी आणि १९९० च्या दशकात यातील बऱ्याच कंपन्यांनी पाकिस्तानातील दहशतवादामुळे आपली सेवा बंद केली. मात्र, गेल्या काही वर्षांत, काही कंपन्या येथे हळूहळू परतत आहेत.

जीना आंतरराष्ट्रीय टर्मिनल

संपादन
 
जिन्नाह टर्मिनल

येथील टर्मिनलला १६ गेट आहेत. याशिवाय इतर १४ विमानांतून प्रवाशांची चढ-उतर करण्याची सुविधा आहे. येथून दरवर्षी ६० लाख प्रवासी ये-जा करतात. ही संख्या विमानतळाच्या क्षमतेच्या अंदाजे अर्धी आहे.

पीआयएचे मुख्यालय येथे असून एर ब्लू आणि शाहीन एरसह पाकिस्तानमधील जवळजवळ सगळ्या खाजगी विमान कंपन्यांची मुख्यालये सुद्धा येथेच आहेत.

देखभाल सुविधा

संपादन
 
विमानांची देखभाल करण्यासाठीचा हॅंगर

कराची विमानतळावर पीआयए, फिलिपाइन एरलाइन्स आणि टर्किश एरलाइन्सच्या विमानांची देखभाल करण्यासाठीची सुविधा आहे. येथे एकाच वेळी दोन बोईंग ७४७ आणि एक बोईंग ७३७ प्रकारच्या विमानांची देखभाल होऊ शकते. २००६पासून येथे बोईंग ७७७ प्रकारच्या विमानांची देखभाल करण्याची सुविधाही झाली आहे.

प्रवासी वाहतूक कंपन्या

संपादन

मालवाहतूक कंपन्या

संपादन

चार्टर कंपन्या

संपादन

अपघात व दुर्घटना

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन