कडकनाथ ही कोंबड्याची एक प्रजाती आहे. या जातीचे स्थानिक नांव "कालामासी" असे आहे, ज्याचा अर्थ काळे मांस असलेली कोंबडी. संपूर्ण काळ्या रंगाच्या या कोंबडीचे रक्त आणि मांसही काळे असते.[] मध्य प्रदेशातील झाबुआ आणि धार जिल्हे आणि राजस्थान तसेच गुजरातलगतचे जिल्हे मिळून अंदाजे ८०० चौरस मैलांचा प्रदेश या जातीचे मुळ उगमस्थान समजले जाते. आदिवासी, स्थानीय निवासी आणि ग्रामीण गरीब लोक बहुतांशी या जातीच्या कोंबड्या पाळतात. हा पक्षी पवित्र समजला जातो आणि दिवाळीनंतर देवीला त्याचा बळी चढवला जातो.[][]

कडकनाथ प्रजातीचा कोबंडा व कोंबडी

वैशिष्ट्ये

संपादन
  • एक दिवसाच्या पिलांचा रंग निळसर ते काळा असतो आणि पाठीवर अनियमित गडद पट्टे असतात.
  • या जातीचे मांस काळे असले आणि पाहायला अयोग्य वाटले तरी ते चविष्ट त्याचबरोबर औषधी असल्याचे मानले जाते.
  • आदिवासी लोक कडकनाथचे रक्त मानवांच्या जुनाट आजारांमध्ये उपचारांमध्ये वापरतात आणि त्याचे मांस कामोत्तेजक म्हणून सेवन करतात.
  • मांस आणि अंडी प्रथिने (मांसामध्ये २५.४७ टक्के) आणि लोह यांनी समृद्ध असल्याचे मानले जाते.
  • २० आठवड्यांनी शरीराचं वजन ९२० ग्रॅम
  • लैंगिकदृष्ट्या पक्वावस्थेत वय १८० दिवस
  • वार्षिक अंडी उत्पादन (संख्या) १०५
  • ४० आठवड्यांनी अंड्याचे वजन ४९ ग्रॅम
  • गर्भधारणक्षमता (%) ५५
  • उबवणक्षमता FES (%) ५२ []

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "कोंबड्यांचे प्रकार व उपलब्धता — विकासपीडिया". mr.vikaspedia.in. 2018-03-20 रोजी पाहिले.
  2. ^ "How Dantewada's Kadaknath chicken could be the new food fad - Black chicken crosses the red corridor". The Economic Times. 2018-03-20 रोजी पाहिले.
  3. ^ "Madhya Pradesh And Chhattisgarh's New Bone Of Contention - The Kadaknath Chicken". NDTV.com. 2018-03-20 रोजी पाहिले.
  4. ^ "Why is Kadaknath's Black Meat Chicken Breed is Healthy to eat ?" Check |url= value (सहाय्य). Indian Fitness मंत्र (इंग्रजी भाषेत). 2018-03-20 रोजी पाहिले.[permanent dead link]

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत