प्रथिने

(प्रथिन या पानावरून पुनर्निर्देशित)

संदर्भ:- आहारातील प्रोटीन ची सर्व माहिती
लेेेखक :- डॉ. विवेकानंंद वि. घोडके



ओळखसंपादन करा

प्रथिने (प्रोटीन्स) ही एक किंवा अधिक पॉलीपेप्टाईड्सना[मराठी शब्द सुचवा] (polypeptides) गोलाकार अथवा रेषेदार स्वरूपात घडी घालून बनलेली जैवरासायनिक संयुगे आहेत. अनेक जैविक क्रिया प्रथिनांद्वारे पार पडतात. प्रथिने ही अमिनो अम्लाची बनलेली असतात. ती सुमारे २० प्रकारची आहेत. शरीरामधल्या पेशींतील पाण्याचे प्रमाण वगळता अधिक वजन प्रथिनांचे असते.

प्रथिनांची कार्ये-[१]

१)मानवी शरीरामधे ऊती व स्नायूंची बांधणी करणे. हाडांची वाढ प्रथिनांमुळे होते.

२)संप्रेेेरके (हार्मोन्स)चे उत्पादन करणे.

३)एंझाइमचे उत्पादन करणे.

४)प्रथिने ऊर्जेचा स्रोत म्हणूूून कार्य करतात.

५)शरीरामधे रोगप्रतिकारशक्ती वाढवते. ६) शरीराची झीज भरून काढते.

प्रथिनांची कमतरतासंपादन करा

प्रथिनांची कमतरता जास्त करून लहान मुलांमध्ये दिसून येते. लहान मुलांमध्ये प्रथिनांची कमतरता झाली तर त्यांना क्वाशिओरकोर / क्वाशिओर्कॉर( kwashiorkor) नावाचा आजार होतो.

अतिरेकी सेवनसंपादन करा

प्रथिनांच्या अतिरेकी सेवनामुळे शरीरात कॅल्शियमचे प्रमाण वाढते. बहुधा मूत्रावाटे ते शरीराबाहेर पडतॆ, पण न पडल्यास मूत्रपिंडात खडे होऊ शकतात. जास्तीचे प्रोटीन हाडांना मजबूत करण्याऐवजी कमजोर करते. शरीरात रेशिय सामग्री कमी होते आणि मलावरोधाचे दुखणे सुरू होते. प्रथिनांच्या जास्तीच्या सेवनामुळे शरीरातील युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते आणि संधिवाताचे आणि गाठीचे (ट्यूमर) दुखणे संभवते.


 
प्रथिने कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये दिसणारा क्वाशिओरकोर
 
प्रथिने कमतरतेमुळे कुपोषण