कांचनजंगा एक्सप्रेस
(कंचनजंगा एक्सप्रेस या पानावरून पुनर्निर्देशित)
कांचनगंगा एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. हिमालयमधील कांचनगंगा शिखरावरून नाव ठेवण्यात आलेली ही गाडी ईशान्य भारताच्या आसाम व त्रिपुरा राज्यांना पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरासोबत जोडते. सुरुवातीला हावडा रेल्वे स्थानक ते न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानकांदरम्यान धावणारी ही गाडी गुवाहाटीपर्यंत वाढवण्यात आली. फेब्रुवारी २०१६ मध्ये ह्या गाडीचा मार्ग सियालदाह रेल्वे स्थानक ते सिलचर असा तर ऑक्टोबर २०१६ मध्ये आगरताळ्यापर्यंत वाढवला गेला. ही गाडी भारतीय रेल्वेच्या उत्तर पूर्व सीमा रेल्वेद्वारे चालवली जाते.
तपशील
संपादन- १५६५७/१५६५८ कांचनगंगा एक्सप्रेस सियालदाह ते गुवाहाटीदरम्यान आठवड्यातील दोन दोवस धावते.
- १५६५९/१५६६० कांचनगंगा एक्सप्रेस सियालदाह ते आगरताळादरम्यान आठवड्यातील दोन दिवस धावते.
- २५६५७/२५६५८ कांचनगंगा एक्सप्रेस सियालदाह ते सिलचरदरम्यान आठवड्यातील तीन दिवस धावते.
मार्ग
संपादन- सियालदाह रेल्वे स्थानक
- वर्धमान रेल्वे स्थानक
- माल्दा टाउन रेल्वे स्थानक
- न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानक
- न्यू कूच बिहार रेल्वे स्थानक
- न्यू अलिपूरद्वार रेल्वे स्थानक
- न्यू बॉंगाइगांव रेल्वे स्थानक
- रंगिया
- गुवाहाटी रेल्वे स्थानक
- लुमडिंग रेल्वे स्थानक
- बदरपूर
- सिलचर रेल्वे स्थानक
- करीमगंज
- धर्मनगर
- अम्बासा
- आगरताळा रेल्वे स्थानक
अपघात व दुर्घटना
संपादन१७ जून, २०२४ रोजी न्यू जलपाईगुडी स्थानकाजवळ कांचनजंगा एक्सप्रेसला मागून मालगाडीने धडक दिली. यात १५ व्यक्ती ठर तर ३० जखमी झाल्या.[१]
- ^ "Kanchanjunga Express accident toll rises to 15: A list of deadly train crashes". CNBC TV18. 17 June 2024. 17 June 2024 रोजी पाहिले.