न्यू जलपाईगुडी जंक्शन रेल्वे स्थानक

पश्चिम बंगालमधील रेल्वे जंक्शन स्टेशन, भारत
(न्यू जलपाईगुडी रेल्वेस्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानक हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जलपाइगुडी जिल्ह्याच्या जलपाइगुडीसिलिगुडी ह्या जुळ्या शहरांमधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. ईशान्य भारताचे प्रवेश्द्वार समजले जाणारे न्यू जलपाईगुडी स्थानक भारतातील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. पश्चिम बंगालमधून आसामसह ईशान्येच्या राज्यांकडे धावणाऱ्या सर्व गाड्या न्यू जलपाईगुडीमार्गेच जातात.

न्यू जलपाईगुडी
নিউ জলপাইগুড়ি
भारतीय रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता सिलिगुडी, पश्चिम बंगाल
गुणक 26°40′58″N 88°26′36″E / 26.68278°N 88.44333°E / 26.68278; 88.44333
समुद्रसपाटीपासूनची उंची ११४ मी
मार्ग हावडा−न्यू जलपाईगुडी रेल्वेमार्ग
बरौनी-गुवाहाटी मार्ग
दार्जीलिंग हिमालयन रेल्वे
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १९६१
विद्युतीकरण नाही
संकेत NJP
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग उत्तर पूर्व सीमा रेल्वे
स्थान
न्यू जलपाईगुडी is located in पश्चिम बंगाल
न्यू जलपाईगुडी
न्यू जलपाईगुडी
पश्चिम बंगालमधील स्थान
स्थानकाची इमारत

इ.स. १९४७ मधील भारताच्या फाळणीनंतर बंगाल व आसाम भागांमधील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. ह्यामुळे सिलिगुडीचे रेल्वे जंक्शन म्हणून महत्त्व वाढीस लागले. १९६० साली भारतीय रेल्वेने अनेक नॅरोगेज व मीटर गेज मार्गांचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यास सुरुवात केली व सिलिगुडीच्या दक्षिणेस नवे स्थानक उभारण्याचा निर्णय घेतला. १९६१ साली उघडले गेलेले न्यू जलपाईगुडी स्थानक लवकरच उत्तर बंगालमधील सर्वात वर्दळीचे स्थानक बनले. दार्जीलिंग ह्या लोकप्रिय पर्यटनस्थळाकडे जाण्यासाठी न्यू जलपाईगुडी येथून दार्जीलिंग हिमालयन रेल्वे सुटते.

प्रमुख गाड्या

संपादन

बाह्य दुवे

संपादन