पूर्वोत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेस

पूर्वोत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. संपर्क क्रांती ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे आसाममधील गुवाहाटीच्या गुवाहाटी रेल्वे स्थानक ते दिल्लीमधील नवी दिल्ली स्थानकांदरम्यान आठवड्यातून तीनदा धावते. उत्तर पूर्व सीमा रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या पूर्वोत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेसला गुवाहाटी ते नवी दिल्ली दरम्यानचे १९७४ किमी अंतर पार करायला ३१ तास लागतात.

पूर्वोत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेसचा मार्ग

तपशील संपादन

वेळापत्रक संपादन

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१२५०१ गुवाहाटी – नवी दिल्ली ०६:०० १३:०० मंगळ, बुध, शनि
१२५०२ नवी दिल्ली – गुवाहाटी २३:४५ ०८:१५ बुध, गुरू, रवि

मार्ग संपादन

स्थानक संकेत स्थानक नाव अंतर (किमी)
GHY गुवाहाटी
GLPT गोलपारा १२९
NBQ न्यू बॉंगाइगांव २०९
NJP न्यू जलपैगुडी ४८६
KIR कटिहार ६८७
ALD अलाहाबाद १३४१
CNB कानपूर सेंट्रल १५३५
NDLS नवी दिल्ली १९७४

बाह्य दुवे संपादन