मालदा टाउन रेल्वे स्थानक
(माल्दा टाउन रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
माल्दा टाउन रेल्वे स्थानक हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील माल्दा जिल्ह्याच्या इंग्लिश बझार शहरातील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. उत्तर बंगालचे प्रवेश्द्वार समजले जाणारे माल्दा टाउन स्थानक भारतातील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. कोलकाताहून आसामसह ईशान्येच्या राज्यांकडे धावणाऱ्या सर्व गाड्या माल्दा टाउनमार्गेच जातात.
माल्दा टाउन মালদা টাউন भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
इमारत | |
स्थानक तपशील | |
पत्ता | इंग्लिश बझार, माल्दा जिल्हा, पश्चिम बंगाल |
गुणक | 25°00′58″N 88°7′49″E / 25.01611°N 88.13028°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | ३० मी |
मार्ग | हावडा−न्यू जलपाईगुडी रेल्वेमार्ग |
फलाट | ७ |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. १९७१ |
विद्युतीकरण | नाही |
संकेत | MLDT |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | पूर्व रेल्वे क्षेत्र |
स्थान | |
|
१९७१ साली फराक्का बॅराज हा २.२४ किमी लांबीचा रेल्वे व रस्ता वाहतूक करणारा गंगा नदीवरील पूल वाहतुकीस खुला करण्यात आला.ह्यामुळे हावडा रेल्वे स्थानक माल्दामार्गे न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानकासोबत जोडले गेले.
प्रमुख गाड्या
संपादन- दार्जीलिंग मेल
- हावडा−न्यू जलपाईगुडी शताब्दी एक्सप्रेस
- कोलकाता-गुवाहाटी - गरीब रथ एक्सप्रेस
- सियालदाह-गुवाहाटी - कांचनगंगा एक्सप्रेस
- हावडा-दिब्रुगढ - कामरूप एक्सप्रेस
- दिब्रुगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस