इर्तिश नदी
इर्तिश (रशियन: Иртыш; कझाक: Ертiс / Yertis; चिनी: 额尔齐斯河; उय्गुर: ئېرتىش; मंगोलियन: Эрчис мөрөн; तातर: Иртеш) ही सायबेरियामधील एक प्रमुख नदी व ओब नदीची उपनदी आहे. इशिम नदी, ऑम नदी, तोबोल नदी आणि तारा नदी इर्तिशच्या प्रमुख उपनद्या आहेत.
इर्तिश | |
---|---|
ओम्स्क येथे इर्तिशचे पात्र | |
इर्तिश नदीच्या मार्गाचा नकाशा | |
उगम | आल्ताय पर्वतरांग |
मुख | ओब नदी |
पाणलोट क्षेत्रामधील देश | चीन, कझाकस्तान, रशिया |
लांबी | ४,२४८ किमी (२,६४० मैल) |
सरासरी प्रवाह | २,१५० घन मी/से (७६,००० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | १६.४३ लाख |
ह्या नदीस मिळते | ओब नदी |
इर्तिश चीनच्या शिंच्यांग प्रांतामधील आल्ताय पर्वतरांगेमध्ये उगम पावते. तेथून कझाकस्तान मार्गे साधारणपणे आग्नेय दिशेस वाहत जाऊन ती ओब नदीला मिळते. ओब-इर्तिशचे पाणलोट क्षेत्र आशियामधील महत्त्वाच्या क्षेत्रांपैकी एक आहे.
ओम्स्क, तोबोल्स्क व खान्ती-मान्सीस्क ही इर्तिश नदीच्या किनाऱ्यावरील रशियामधील प्रमुख शहरे आहेत.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत