ओब नदी
ओब (रशियन: Обь) ही रशियाच्या सायबेरिया प्रदेशामधील तीन विशाल नद्यांपैकी एक नदी आहे (इतर दोन नद्या: लेना व येनिसे). रशियाच्या दक्षिण भागातील आल्ताय क्रायमधील बियिस्क शहराजवळ बिया व कातुन ह्या दोन नद्यांच्या संगमामधून ओबची सुरुवात होते. ह्या दोन्ही नद्या आल्ताय पर्वतरांगेमध्ये उगम पावतात. रशियाच्या उत्तर भागात ओबला इर्तिश ही दुसरी मोठी नदी मिळते. ओब व इर्तिश नद्यांची एकत्रित लांबी ५,४१० किमी इतकी आहे.
ओब Обь | |
---|---|
बर्नाउलजवळ ओबचे पात्र | |
ओब नदीच्या मार्गाचा नकाशा | |
उगम | बेलुखा पर्वत, आल्ताय प्रजासत्ताक, रशिया |
मुख | कारा समुद्र, आर्क्टिक महासागर |
पाणलोट क्षेत्रामधील देश | रशिया |
लांबी | ३,६५० किमी (२,२७० मैल) |
उगम स्थान उंची | २,३०० मी (७,५०० फूट) |
सरासरी प्रवाह | १२,४७५ घन मी/से (४,४०,६०० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | २९,७२,४९७ |
ओब नदी रशियाच्या आल्ताय क्राय, नोवोसिबिर्स्क ओब्लास्त, तोम्स्क ओब्लास्त, खान्ती-मान्सी स्वायत्त ऑक्रूग व यमेलो-नेनेत्स स्वायत्त ऑक्रूग ह्या राजकीय विभागांमधून वाहते व बर्नाउल, नोव्होसिबिर्स्क, खान्ती-मान्सीस्क ही मोठी शहरे ओबच्या काठावर वसली आहेत.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- माहिती Archived 2004-12-14 at the Wayback Machine.